मदिराक्षी मुंडलेनंतर दाक्षिणात्य अभिनेत्री कार्तिका नायर झळकणार मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:48 IST2016-12-20T17:15:17+5:302016-12-21T16:48:05+5:30

सिया के राम या मालिकेत झळकलेल्या मदिराक्षी मुंडलेने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिला तितकीशी प्रसिद्धी ...

South Korean actress Kartika Nayar will be seen in the series after Madirakshi Mundale | मदिराक्षी मुंडलेनंतर दाक्षिणात्य अभिनेत्री कार्तिका नायर झळकणार मालिकेत

मदिराक्षी मुंडलेनंतर दाक्षिणात्य अभिनेत्री कार्तिका नायर झळकणार मालिकेत

या के राम या मालिकेत झळकलेल्या मदिराक्षी मुंडलेने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली. पण सिया के राम या मालिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. तिने साकारलेली सिता प्रेक्षकांना खूपच आवडली आणि आता तिच्यानंतर आणखी एक दाक्षिणात्य अभिनेत्री छोट्या पडद्यावर झळकणार आहे. 
कार्तिका नायर असे या अभिनेत्रीचे नाव असून ती प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राधाची मुलगी आहे. कार्तिका रजनीश दुग्गलसोबत मालिकेत झळकणार आहे. रजनिश प्रसिद्ध अभिनेता असण्यासोबतच मिस्टर इंडिया आहे. रजनीश आणि कार्तिकाची प्रमुख भूमिका असणारी ही आरंभ मालिका बिग बजेट असून ही केवळ 100 भागांचीच असणार आहे. द्रविड आणि आर्यन यांच्यात पूर्वी असलेल्या वादावर आधारित ही मालिका असणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक गोल्डी बेहल करणार आहे. या मालिकेद्वारे गोल्डी छोट्या पडद्यावर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. गोल्डी बेहल हा सोनाली बेद्रेंचा नवरा असून त्याने द्रोणा, बस इतना सा ख्वाब है यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान यांसारखे मोठ्या पडद्यावरील दिग्गजही छोट्या पडद्यावर काम करताना आपल्याला दिसत आहे. छोटा पडदा आता सगळ्यांनाच खुणवू लागला आहे. त्यामुळे दाक्षिणात्य अभिनेतेदेखील छोट्या पडद्यावर काम करण्यास उत्सुक आहेत. 
कार्तिका छोट्या पडद्यावर आपला जम बसवते की नाही हे आपल्याला काहीच दिवसांतच कळणार आहे. 

Web Title: South Korean actress Kartika Nayar will be seen in the series after Madirakshi Mundale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.