जिद्द चित्रपटाचं गीतध्वनीमुद्रण संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 20:30 IST2016-04-01T03:30:40+5:302016-03-31T20:30:40+5:30

आजच्या तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाऊ लागली आहे. सुशिला प्रॉडक्शन निर्मित आगामी जिद्द हा मराठी चित्रपट ...

The song's songprint of Zid | जिद्द चित्रपटाचं गीतध्वनीमुद्रण संपन्न

जिद्द चित्रपटाचं गीतध्वनीमुद्रण संपन्न

च्या तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाऊ लागली आहे. सुशिला प्रॉडक्शन निर्मित आगामी जिद्द हा मराठी चित्रपट ही याच धाटणीचा आहे. संतोषजी कातकाडे निर्मित आनंद बच्छाव (साईआनंद) दिग्दर्शित या सिनेमाचं गीतध्वनीमुद्रण नुकतंच आजीवासन स्टुडिओत संपन्न झालं.
संतोष कातकाडे यांनी शब्दबद्ध केलेल्या जिद्द चित्रपटातील गीतांना स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, संचेती सकट या गायकांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत अतुल-राहुल यांचं आहे. ‘माझ्या स्वप्नामधी’ हे आयटम सॉंग, ‘प्रेमभाषा’ हे प्रेमगीत, ‘व्हॉटसअप पोरी तुझा चेहरा’, ‘जगण्याची आस आता’ हे विरह गीत अशा वेगवेगळ्या जॉनरची गाणी यावेळी ध्वनीमुद्रित करण्यात आली.

जिद्द या कॉलेजविश्वावर आधारित सिनेमात एका विद्यार्थ्याच्या जिद्दीची कहाणी उलगडणार आहे. चित्रपटाची कथा पटकथा संतोष कातकाडे यांची असून संवाद अभिजीत कुलकर्णी यांचे आहेत. छायांकन गोपाल कोतीयाल याचं आहे. सहदिग्दर्शन प्रशांत वेलकर व रश्मी जाधव यांचं असून कलादिग्दर्शन मधु कांबळे, प्रतिक चांदवडकर यांचं आहे. कार्यकारी निर्माते संदीप कदम आहेत. दिपक शिर्के, अरुण गीते, सुनील गोडबोले, विक्रांत ठाकरे, प्रतिक चांदवडकर, ज्ञानेश्वर वाघ, पुजा राज या कलाकारांच्या भूमिका आहेत.
 

Web Title: The song's songprint of Zid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.