रिश्ता लिखेंगे हम नया मालिकेत सोनम लांबालाची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 12:26 IST2018-04-03T06:56:37+5:302018-04-03T12:26:37+5:30
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री सोनम लंबा लवकरच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील रिश्ता लिखेंगे हम नया या लोकप्रिय मालिकेत दाखल होणार आहे. ...

रिश्ता लिखेंगे हम नया मालिकेत सोनम लांबालाची एन्ट्री
ट लिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री सोनम लंबा लवकरच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील रिश्ता लिखेंगे हम नया या लोकप्रिय मालिकेत दाखल होणार आहे. गाजलेल्या मालिकांमधून काम करून सोनमने टेलिव्हिजन मनोरंजन उद्योगात आपला ठसा उमटवला आहे. या मालिकेत ती मीठी नावाची एक आकर्षक व्यक्तिरेखा साकारत आहे, जिचा व्यवसाय आहे मिठाई बनवणे. एका फूड फेस्टिव्हलमध्ये ती अचानक रतनला भेटते. दीया आणि रतनच्या बहरत असलेल्या प्रेमकहाणीला मीठीच्या प्रवेशामुळे एक वेगळे वळण मिळेल.
सोनम लांबाला विचारले असता, तिने सांगितले, “होय, हे खरे आहे. मी या मालिकेत मीठी ही एक आगळी-वेगळी व्यक्तिरेखा साकारत आहे. मीठी एक बोलघेवडी मुलगी आहे, चैतन्याने सळसळणारी आहे व आपल्या व्यवसायाबाबत एकनिष्ठ आहे. मी एका वेगळ्या भूमिकेची वाटच बघत होते, ज्यातून मला माझे अष्टपैलुत्व दाखवता येईल. मी यापूर्वी रोहितसोबत पडद्यावर त्याची
बहीण म्हणून काम केलेले आहे. आता ही वेगळीच भूमिका आहे. तो मजेशीर आहे आणि स्वतःच्या कामाच्या बाबतीत समर्पित आहे. त्याच्यासोबत पुन्हा काम करण्यास मी उत्सुक आहे. लोकांना माझा नवा अवतार कसा वाटतो, हे बघणे रोचक ठरेल. असे म्हणता येईल की, मीठीची भूमिका अशी आहे, जिच्यामुळे दीया आणि रतन यांच्या नातेसंबंधात बदल घडून येतील.”
आगामी कथानकात आपण पाहणार आहोत की, दीयाला (तेजस्वी प्रकाश) रतन सा (रोहित सुचंती) बद्दल खास भावना जाणवू लागली आहे आणि ती त्याला प्रपोझ करण्याचा देखील विचार करते आहे. कथेतील नवीन वळणावर काय होईल? रतन आणि दीया दूर होतील का? रतनला देखील दीयाबद्दल काही खास भावना आहेत का?