n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">इथेच टाका तंबू या मालिकेत कपिलच्या घराण्यातील गणपती कित्येक वर्षांपासून कुठे आहे हे कोणालाच माहीत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. हा गणपती कपिलने शोधावा अशी त्याची आजी त्याच्याकडे इच्छा व्यक्त करते. हा गणपती शोधायला एक अनोळखी त्याला मदत करणार आहे. गणपती कुठे असेल हा कपिल विचार करत असतानाच एक साधू रामाश्रयमध्ये येणार आहे आणि त्याला एक कोडे सोडवायला सांगणार आहे. या कोड्याची उकल केल्यानंतर कपिल रामाश्रय येथील एका जागेवर पोहोचणार आहे. तिथली जमीन खणल्यावर त्याला तिथे एक छोटूसा गणपती बाप्पा मिळणार आहे. रामाश्रयमधील मंडळी आता त्या गणपतीची स्थापना घरात करणार आहे. पण हा गणपती जमिनीखाली कोणी लपवला आहे याचे गुढ कायम राहाणार आहे. याचा शोध घ्यायचे कपिलने आता ठरवले आहे. कपिलला या गणपतीमागचे रहस्य कळते की नाही हे पुढील काळातच कळेल.