​मेरे साई या मालिकेद्वारे दिला जाणार सामाजिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 07:36 AM2018-02-12T07:36:27+5:302018-02-12T13:08:33+5:30

मेरे साई या मालिकेत सध्या अबीर सूफी साई बाबांची भूमिका साकारत आहे. त्याने आजच्या पिढीसाठी एक खूपच चांगला संदेश ...

The social message given by this series of my sai | ​मेरे साई या मालिकेद्वारे दिला जाणार सामाजिक संदेश

​मेरे साई या मालिकेद्वारे दिला जाणार सामाजिक संदेश

googlenewsNext
रे साई या मालिकेत सध्या अबीर सूफी साई बाबांची भूमिका साकारत आहे. त्याने आजच्या पिढीसाठी एक खूपच चांगला संदेश नुकताच दिला आहे. आजच्या गतिशील जगात लोक आपल्या दैनंदिन कामामुळे आणि रोजच्या प्रवासामुळे प्रचंड कंटाळलेले असतात. तरुण लोकांना विश्रांतीसाठी देखील वेळ मिळत नाही आणि मग ते आपला ताण कमी करण्यासाठी दारू आणि ड्रग्ससारख्या व्यसनांकडे ओढले जातात. ड्रग्सला आळा घालणे ही आजच्या काळाची गरज आहे. अबीर हा अभिनेता असला तरी त्याने कायद्याचे शिक्षण घेतले आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तो वकिली देखील करत होता. तो वकील म्हणून काम करत असताना ड्रग्सच्या अधीन गेलेल्या लोकांची अनेक प्रकरणे त्याने हाताळली आहेत. लोक व्यसनांच्या किती अधीन गेले आहेत हे पाहून तो व्यथित होत असे. मेरे साई या मालिकेतील सध्याच्या कथानकात शिर्डी गावात ड्रग्सचे दूषण कसे पसरत चालले होते हे दाखवण्यात येत आहे. साई बाबांनी गावकर्‍यांना ड्रग्सच्या व्यसनाच्या तावडीतून कसे मुक्त केले हे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ड्रग्सच्या व्यसनाविषयी अबीर सांगतो, “नट बनण्यापूर्वी मी वकील होतो आणि काही काळ मी वकिली देखील केली आहे. त्या काळात मला असे काही लोक भेटले, जे आपली ड्रग्सची भूक भागवण्यासाठी गुन्हेगारीकडे वळले होते. ड्रग्स खरेदी करण्यासाठी लोक चोरीमारी करत होते, हे पाहणे फार क्लेशकारक होते. मला हे समजूच शकत नव्हते की, लोक अशा व्यसनाच्या आहारी का जातात, जे व्यसन तुमचा सर्वनाश करते. मला शक्य होईल तेव्हा मी त्यांना या व्यसनापासून लांब राहण्याचा सल्ला देत असे. मला आनंद वाटतो, की मालिकेतील आगामी कथानकाद्वारे हा मौल्यवान संदेश जगभरातील सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. मी क्रिएटिव्ह टीमशी संवादांबाबत चर्चा केली आणि त्यात माझ्या वतीने काही भर देखील घातली आहे. सर्वांना ही नम्र विनंती आहे की, ड्रग्सपासून दूर रहा. हे ड्रग्स तुमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. दारू आणि ड्रग्सने जीवनातील कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. प्रत्येकाने खंबीर होऊन जीवनातील आनंद शोधला पाहिजे. या मालिकेत आम्ही शिर्डीला त्या काळात ड्रग्सच्या व्यसनाने कसे ग्रासले होते आणि साईंनी या व्यसनापासून लांब राहण्याचा उपदेश देऊन गावकर्‍यांचे कसे रक्षण केले हे दाखवणार आहोत.”

Also Read : ​मेरे साई या मालिकेतील या दृश्यासाठी सुप्रिया पिळगांवकर यांना घ्यावे लागले अनेक रिटेक

Web Title: The social message given by this series of my sai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.