म्हणून बॉयफ्रेंड युवराज ठाकुरला सोडून गौरव चोप्रासह बानीचे नातं बनतंय घट्ट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 11:22 IST2017-02-06T11:46:21+5:302017-02-07T11:22:39+5:30
बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचं अफेअर, त्यांचं ब्रेकअप, लग्न, मग काडीमोड हे काही नवं राहिलेलं नाही. प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना ...
.jpg)
म्हणून बॉयफ्रेंड युवराज ठाकुरला सोडून गौरव चोप्रासह बानीचे नातं बनतंय घट्ट?
ब ग बॉसच्या घरातील स्पर्धकांचं अफेअर, त्यांचं ब्रेकअप, लग्न, मग काडीमोड हे काही नवं राहिलेलं नाही. प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धकाच्या अफेअरच्या चर्चा या कानावर येतच असतात. यंदाच्या बिग बॉसचा सीझनसुद्धा याला अपवाद राहिला नाही. या शोमध्ये बानीने आपल्या रिअल लाइफमधल्या स्पेशल व्यक्तीबाबत विधान केले होते. त्यावेळी बानीने कुणाचंही नाव घेतले नव्हतं. त्याचवेळी बानीचं टीव्ही अभिनेता युवराज ठाकूरसोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. बानीनं केलेल्या विधानानंतर युवराजनं सोशल मीडियावर दोघांमधील प्रेमाच्या नात्याची उघड उघड कबूली दिली होती. मात्र बिग बॉसचा सीझन संपला आहे. शो संपल्यानंतर बानी आपल्या रिअल लाइफच्या स्पेशल व्यक्तीला म्हणजेच युवराजला भेटायला जाईल असे अनेकांना वाटलं असेल. मात्र युवराजला भेटण्याऐवजी बानी थेट पोहचली ती बिग बॉसच्या घरातील तिचा स्पर्धक आणि अभिनेता गौरव चोपडाकडे. गौरवसोबत बानी लंचला गेल्याच्याही बातम्या आल्या. सध्या बानी आपल्या कुटुंबीयांसह लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मात्र इकडे तिचा बॉयफ्रेंड म्हणवून घेणारा युवराज तिच्याशिवाय झुरतोय. दोघांमध्ये सध्या काही आलबेल नसल्याचे वाटते आहे. याला कारण आहे युवराजचे इन्स्टाग्रामवरील पोस्ट. यांत बानीशिवाय आपण एकटे असल्याचे म्हटले आहे. ‘मी तुझ्यामध्ये स्वतःला बघतो. तुझ्याशिवाय काहीच नाही. मी तुझ्यात स्वतःला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र आता तुझ्यात मी स्वतःला पाहूच शकत नाही. मी तुला पूर्णपणे हरवून बसलो आणि तू मला हरवून बसली आहेस असे मला वाटते आहे. हे खरं आहे का ? आपण एकमेंकांवर प्रेम कधीच केले नाही का ?’ असे विविध भावनिक सवाल युवराजनं त्या पोस्टमध्ये विचारले आहेत. त्यावरुन एकच चर्चा सुरु झाल्या आहेत की बानीने युवराजला सोडून गौरवला आपल्या जीवनातील स्पेशल व्यक्तीची जागा दिली आहे. बानी आणि युवराजची भेट जिममध्ये झाली होती. चार महिन्यांपर्यंत त्यांचं अफेअर होतं.
![]()