म्हणून 'मेरी हानिकारक बीवी'च्या सेटवर लारा दत्ताची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 11:25 IST2018-03-16T05:55:23+5:302018-03-16T11:25:23+5:30
नव्या डान्स रिअॅलिटी शो 'हाय फिव्हर...डान्स का नया तेवर'चा प्रोमा प्रदर्शित होताच त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला ...

म्हणून 'मेरी हानिकारक बीवी'च्या सेटवर लारा दत्ताची एंट्री
न ्या डान्स रिअॅलिटी शो 'हाय फिव्हर...डान्स का नया तेवर'चा प्रोमा प्रदर्शित होताच त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.अशा प्रकारची ही पहिलीच संकल्पना असून सध्या या शोची बरीच चर्चा आहे.सध्या या शो चे अगदी जोरात प्रमोशन सुरू आहे.शोचे परीक्षकदेखील प्रमोशनमध्ये सहभागी होत आहेत.लोकप्रिय मालिका 'मेरी हानिकारक बीवी'मध्ये लवकरच शोमधील परीक्षकांपैकी एक लारा दत्ता दिसणार आहे.लारा दत्ताचा वाहनचालक,गिरपडकर खाडे ही भूमिका साकारणारा शो चा सहनिवेदक नितेश शेट्टीसह लारा दत्ता या मालिकेत दिसणार आहे.येणाऱ्या भागात नव्या डान्स रिअॅलिटी शो हाय फिव्हर मध्ये वेगवेगळ्या जोड्या आपली कमाल दाखवणार असल्याचे देविनाच्या वाचनात येते.ही संकल्पना वाचल्यानंतर तिच्या असे मनात येते की,आपले सुंदर नाते लक्षात घेता ती आणि पुष्पा यांनीदेखील यामध्ये सहभागी व्हावे.ही स्पर्धा खूपच कठीण असेल असे सांगत पहिल्यांदा पुष्पा नकार देते.पण आपली निवड झाली तर आपण प्रसिद्ध होऊ असे सांगून देविना पुष्पाला यासाठी तयार करते.अजिबात वेळ न घालवता दोघीही प्रॅक्टिस करण्यात बिझी असतात आणि तेव्हाच लारा दत्ता त्यांच्यासमक्ष येऊन उभी राहिल्यावर त्यांना धक्काच बसतो.याविषयी सुचेता खन्नाला (पुष्पा) विचारले असता तिने सांगितले, “तिच्याबरोबर शूटिंग करताना खूपच वेगळा अनुभव मिळाला.सेटवरील प्रत्येकजण लारा दत्ता येणार म्हणून खूपच उत्साहात होते.ती फारच प्रेमळ व्यक्ती असून तिच्यासह शूटिंग करताना खूप मजा आली.”मालिकेत देविनाची भूमिका साकारणारी अंजली मुखी यावेळी म्हणाली,“लारा ही अप्रतिम अभिनेत्री आहे.ती खूप क्लासी,सुंदर आहे आणि तिला अभिनयाची जाण अप्रतिम आहे.विशेष म्हणजे तिचे सगळे संवाद ती वनटेक संपवते आणि अजिबात वेळ न घालवता आम्ही आमचे शूट संपवले.तिच्यासबोत काम करताना खूपच पॉजिटीव्हीटी येते.अजूनही तिने स्वतःमध्ये एक लहान मूल जपले आहे आणि तिच्याबरोबर शूटिंग करून खूप मजा आली.”रसिकांना या शोमध्ये नितेश शेट्टीलादेखील पाहता येणार असून शो मध्ये येण्यासाठी त्याचे सततचे अयशस्वी प्रयत्न दिसणार आहेत आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाणे बॉम डिगीवर डान्स करत तो लाराला इंम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.