स्नेहा वाघने असे वाचवले 500 रू,वाचा नेमके काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 12:26 IST2017-06-17T06:56:16+5:302017-06-17T12:26:16+5:30
‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ मालिकेच्या सेटवर एक गमतीदार आणि बोधप्रद किस्सा घडला. एका गंभीर प्रसंगाचे चित्रीकरण सुरू असताना ...
.jpg)
स्नेहा वाघने असे वाचवले 500 रू,वाचा नेमके काय घडले?
‘ ेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ मालिकेच्या सेटवर एक गमतीदार आणि बोधप्रद किस्सा घडला. एका गंभीर प्रसंगाचे चित्रीकरण सुरू असताना मालिकेत राज कौरची भूमिका साकारणारी स्नेहा वाघच्या मोबाईल फोनची रिंग जोरात वाजू लागली. त्यामुळे या प्रसंगाचे चित्रीकरण थांबवावे लागले. या ‘चुकी’ची शिक्षा म्हणून स्नेहा वाघला सेटवरील सर्वांना आइस्क्रीमची ट्रीट ‘दंड’ भरावा लागला. कलाकार सेटवर असताना चित्रीकरण सुरळीत आणि विनाव्यत्यय पार पाडण्यासाठी कलाकारांना आपले मोबाईल बंद करून ठेवण्याचा नियम निर्मात्यांनी केला आहे. या नियमाचे पालन जो कोणी करणार नाही मग तो निर्माता असो किंवा मग दिग्दर्शक, कलाकार असो प्रत्येकाला 500 रुपये दंड भरावा लागणार असा नियम आता मालिकांच्या सेटवर करण्यात आला आहे. स्नेहाच्या बाबतीत असेच घडले त्यादिवशी सेटवर फोन सायलेंटमोडवर ठेवायला स्नेहा विसरली होती. आचानक तिला फोन आला, तिचा फोन त्यामुळे स्नेहा नियमाते उल्लंघन केल्यामुळे तिला आता दंड भरण्यास भाग होते. मात्र तिने 500 रूपये न भरता सर्वांना आइस्क्रीमची पार्टी देऊन दंड भरला. यासंदर्भात स्नेहा वाघ सांगते, “होय, चित्रीकरणादरम्यान कोणाच्या फोनची बेल वाजली, तर त्याला उपस्थित सर्व सहकलाकारांना 500 रू.दंड द्यावा लागतो, असा नवा नियम करण्यात आला आहे. त्या दिवशी मी माझा फोन सायलेंट मोडवर ठेवण्यास विसरले आणि अचानक फोन आल्यामुळे माझ्याकडून नियम तोडला गेला होता. त्यामुळे मला 500 रुपयांचा दंड भरावा लागणार होता.पण उकाड्य़ाचे दिवस लक्षात घेऊन मी सा-या युनिटला आइस्क्रीमची पार्टी देण्याचा ठरवले.मात्र त्यातून मी योग्य तो धडा शिकले असून आता चित्रीकरणाच्या वेळी माझा फोन मी कायम सायलेंट मोडवरच ठेवते.”