स्मृती खन्नाची ‘बालिका वधू’मधून एक्झिट ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 13:11 IST2016-06-23T07:41:21+5:302016-06-23T13:11:21+5:30
'मेरी आशिकी तुमसे ही’ फेम स्मृती खन्ना हिनं बालिका वधू या मालिकेमधून एक्झिट घेण्याचं ठरवलंय. मालिकेत फक्त प्रमुख कलाकारांवर ...

स्मृती खन्नाची ‘बालिका वधू’मधून एक्झिट ?
एक्झिट घेण्याचं ठरवलंय. मालिकेत फक्त प्रमुख कलाकारांवर लक्ष केंद्रित
करण्यात आलं असून इतर कलाकारांना फारसा वाव दिला जात नसल्याचा आरोप
स्मृतीनं केलाय. बालिका वधू मालिकेत माही वीज आणि रुसलान मुमताज
यांच्यावरच जास्त लक्ष दिलं जात असून आपल्याला मालिकेत फारसं करण्यासारखं
काही मिळत नसल्याचं स्मृतीचं म्हणणं आहे.या मालिकेतील भूमिकेऐवजी काही
तरी वेगळं करण्याचा स्मृतीनं ठरवलंय.काही दिवसांपूर्वी बालिका वधू या
मालिकेत अनेक नव्या चेह-यांना घेऊन कथानकात काहीसा बदल करण्यात आला.
नव्या चेह-यांमध्ये माही वीज, रुसलान मुमताज, स्मृती खन्ना, अविनाश सचदेव
हे नवे चेहरे घेण्यात आले. मात्र आधी टाइम स्लॉट बदलल्यानं अविनाश नाराज
असल्याच्या बातम्या कानावर आल्या. तर आता स्मृतीनं मालिकेतून एक्झिट
घेण्याचा निर्णय घेतला.त्यामुळं बालिका वधूमध्ये ऑल इज नॉट वेल.