स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अॅक्ट्रेस'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 09:30 IST2025-07-09T09:29:26+5:302025-07-09T09:30:06+5:30
Smriti Irani : छोट्या पडद्यावरील 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही लोकप्रिय मालिका टीव्हीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री स्मृती ईराणी जवळजवळ १७ वर्षांनी तुलसीच्या भूमिकेत अभिनयाच्या जगात परतत आहेत.

स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अॅक्ट्रेस'
छोट्या पडद्यावरील 'क्योंकी सास भी कभी बहू थी' (Kyonki Saas Bhi Kabhi Bahu Thi) ही लोकप्रिय मालिका टीव्हीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) जवळजवळ १७ वर्षांनी तुलसीच्या भूमिकेत अभिनयाच्या जगात परतत आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात बऱ्याच काळापासून नाव कमावणाऱ्या स्मृती यांनी अलीकडेच एका मुलाखतीत त्यांच्या पुनरागमनाबद्दल सांगितले आणि त्या अभिनय आणि राजकारणाच्या क्षेत्रात स्वतःचे मूल्यांकन करत असल्याचे त्यांनी म्हटले.
'क्योंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही मालिकेच्या पुनरागमनाबाबत स्मृती इराणी यांचे नाव सतत चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून स्मृती अभिनयाच्या जगात कधी परतणार याबद्दल चर्चा सुरू होती, जी आता या मालिकेच्या पुनरागमनाने निश्चित झाली आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या कमबॅकबद्दल सांगितले.
''मी एक अर्धवेळ अभिनेत्री आणि पूर्णवेळ...''
स्मृती ईराणी यांनी म्हटलं की, ''बघा, मी माझ्या पुनरागमनाबद्दल अजिबात घाबरत नाही. मी एक राजकारणी आहे आणि मला आता अशा गोष्टींची भीती वाटत नाही. पण खूप बदल झाले आहेत कारण आज टीव्ही पाहण्याची पद्धत आणि २५ वर्षांपूर्वी तो कसा पाहिला जात होता यात खूप मोठे बदल झाले आहेत. ओटीटीने खूप फरक केला आहे. देशाच्या कथा सांगण्याचा हा एक अविभाज्य भाग आहे आणि दोघांचेही काम महसूल निर्माण करण्याचे आहे. जसे अनेक राजकारणी वकील आणि शिक्षिका असतात, तसेच मी एक अर्धवेळ अभिनेत्री आणि पूर्णवेळ नेता आहे.'' अशाप्रकारे, स्मृती ईराणी यांनी 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्ये तुसली विराणीच्या भूमिकेत परतण्याबद्दल आणि इतर अनेक पैलूंवर उघडपणे चर्चा केली आहे. २०१९ ते २०२४ पर्यंत त्या उत्तर प्रदेशातील लोकप्रिय लोकसभा मतदारसंघ अमेठी येथून भाजपच्या खासदार राहिल्या आहेत.
स्मृती ईराणी यांची मालिका कधी येणार भेटीला?
स्मृती ईराणी यांच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेचा प्रोमो काल रात्री उशिरा ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारने रिलीज केला आहे. ज्यामध्ये ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे की ही मालिका २९ जुलै २०२५ पासून रात्री १०:३० वाजता स्टार प्लस चॅनेल आणि जिओ हॉटस्टारवर दाखवली जाईल.