& जरा हटकेचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 00:35 IST2016-03-13T07:35:07+5:302016-03-13T00:35:07+5:30
फायनली, प्रकाश कुंटे दिग्दर्शित जरा हटके या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच उलगडण्यात आला.

& जरा हटकेचा ट्रेलर प्रदर्शित
द ग्दर्शक रवी जाधव फिल्मस आणि एरॉस एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत & जरा हटके या चित्रपटाची चर्चा खूपच दिवसापासून एकून होते. फायनली, प्रकाश कुंटे दिग्दर्शित जरा हटके या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच उलगडण्यात आला. बंगाली आणि मराठी संस्कृतीचा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एका मध्यमवयीन स्त्री-पुरूषाच्या सुंदर नात्याभोवती सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे. मध्यमवयात पुन्हा विवाह करण्यासारखा धाडसी निर्णय हे जोडपं घेतं. मग त्याचं हे नातं त्यांच्या पहिल्या लग्नापासूनची मुलं कसं स्विकारतात हे आपल्याला रंजक पध्दतीने या चित्रपटात अनुभवता येणार आहे. बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करत आहे.तर इंद्रनील आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत.या व्यतिरिक्त सिध्दार्थ मेनन, शिवानी रंगोले, स्पृहा जोशी, सोनाली खरे आदी कलाकारंचा या चित्रपटात समावेश आहे.