छोटा पडदा हे लेखकांचे माध्यमः मानसी साळवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 17:52 IST2017-03-14T12:22:59+5:302017-03-14T17:52:59+5:30
मानसी साळवीने कोई अपना सा, पवित्र रिश्ता, सपने सुहाने लडकपन के, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा ...

छोटा पडदा हे लेखकांचे माध्यमः मानसी साळवी
म नसी साळवीने कोई अपना सा, पवित्र रिश्ता, सपने सुहाने लडकपन के, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ती आता एक आस्था ऐसे भी या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...
या मालिकेत तू साकारत असलेल्या भूमिकेविषयी काय सांगशील?
या मालिकेत मी लक्ष्मी अग्रवाल या भूमिकेत झळकणार असून लघुउद्योग क्षेत्रात कार्यरत असलेली ही स्त्री आहे. तिने आपल्या मेहनतीवर संपूर्ण घर उभे केले आहे. तिचा मुलगा शिव असून आस्था तिच्या घरात सून म्हणून येणार आहे. आमच्या कुटुंबाचा प्रवास प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
तू गेल्या अनेक वर्षांपासून मालिकांमध्ये काम करत आहेस, तू करियर आणि घर यांच्यात ताळमेळ कशाप्रकारे घालतेस?
करियर सांभाळून आपले घर सांभाळण्याची कला प्रत्येक स्त्रीमध्ये उपजतच असते असे मला वाटते. मी काम करत असल्याने मला माझ्या मुलीला द्यायला खूपच कमी वेळ मिळतो. मी सकाळी चित्रीकरणाला जाते, त्यावेळी ती शाळेत गेलेली असते आणि रात्री मी पोहोचते त्यावेळी ती झोपलेली असते. मी महिन्यातील 25 दिवस तरी चित्रीकरण करत असल्याने तिच्यासाठी वेळ देणे मला शक्य होत नाही. पण पॅक अप लवकर झाल्यास अथवा सुट्टीच्या दिवशी माझा संपूर्ण दिवस हा तिचाच असतो. क्वांटीटी टाइम देणे मला शक्य नसल्याने मी तिला क्वालिटी टाइम देते.
तू आज डेली सोपमध्ये काम करत असलीस तरी ज्यावेळी मालिका आठवड्यातून एकदा लागायच्या त्यावेळीदेखील तू छोट्या पडद्याचा भाग होतीस. इतक्या वर्षांत छोट्या पडद्यावर काय काय बदल झाला असे तुला वाटते?
पूर्वी मालिका या आठवड्यातून एकदा असायच्या तर आता त्या रोज असतात. त्यामुळे शेड्युल हेक्टिक झाले आहे. मी सुरुवातीला काम करत असताना कॉलेजमध्ये शिकत होती. मी चित्रीकरण सांभाळून माझे शिक्षण पूर्ण केले. पण आजकालच्या मुलांना ते शक्य होत नाही. त्यांचे दिवसातील जास्तीत जास्त तास हे चित्रीकरणात जातात. तसेच मालिका अनेक वर्षं सुरू राहात असल्याने त्यांना त्यांचे शिक्षण लवकर सोडावे लागते.
छोट्या पडद्यावरील आजच्या मालिकांविषयी तुझे काय म्हणणे आहे?
छोटा पडदा हे लेखकांचे माध्यम आहे असे मला वाटते. छोट्या पडद्यावर चांगल्या लेखकांची वानवा आहे असे म्हटले जाते. पण ही गोष्ट पूर्णपणे चुकीचे असल्याचे मला वाटते. छोट्या पडद्यावर खूप चांगले लेखक असून त्यांनी आज छोट्या पडद्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.