छोट्या पडद्यावरील मालिका 'ससुराल सिमर का', 'उडान'मध्ये पाहायला मिळणार महाशिवरात्रीचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 11:40 IST2017-02-23T06:10:26+5:302017-02-23T11:40:26+5:30

छोट्या पडद्यावर सध्या सगळ्याच मालिकेत रोमँटीक ट्रॅक सुरू असल्याचे पाहायला मिळतंय.या ट्रॅकलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय मात्र आता मालिकेतील ...

The small screen series 'Sasural Simhara ki', 'Udan' will see Mahashivratri's enthusiasm | छोट्या पडद्यावरील मालिका 'ससुराल सिमर का', 'उडान'मध्ये पाहायला मिळणार महाशिवरात्रीचा उत्साह

छोट्या पडद्यावरील मालिका 'ससुराल सिमर का', 'उडान'मध्ये पाहायला मिळणार महाशिवरात्रीचा उत्साह

ट्या पडद्यावर सध्या सगळ्याच मालिकेत रोमँटीक ट्रॅक सुरू असल्याचे पाहायला मिळतंय.या ट्रॅकलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय मात्र आता मालिकेतील  कलाकार भक्तीरसात मग्न असल्याचे पाहायला मिळती. होय, आता मालिकेतील ट्रॅक बदलणार असून थोडा भक्तीमय झालेला पहायला मिळणार आहे.महाशिवरात्री निमित्त  रसिकांना आध्यात्मिक मार्गावर नेण्याची संपूर्ण तयारी या मालिकेच्या टीमने  केली आहे,'ससुराल सिमर का', 'उडान' आणि पौराणिक मालिका 'कर्मफल दाता शनि' या लोकप्रिय मालिकांध्ये विशेष कथानकाता आता महाशिवरात्रीचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.

 
ससुराल सिमर का मध्ये महाशिवरात्रीला अंजली (वैशाली ठक्कर) ला ताई (श्वेता गौतम) आव्हान देणार आहे आणि ती तिला वेगवेगळ्या चाचण्यांतून जायला लावणार आहे आणि अगदी कमी वेळात तिला शिव पूजेचा सर्व विधी करायला सांगणार आहे. तर दुसरीकडे, भारद्वाज कुटुंबात पीयुष (वरुण शर्मा) आणि रोशनी (निक्की शर्मा) यांना महाशिवरात्रीची पूजा जोडीने करायला सांगीतली जाणार आहे. पण रोशनीला निराश करून पीयुष हा धार्मिक विधी मध्येच सोडून त्याच्या प्रेयसीकडे, वैदेही (काजोल श्रीवास्तव) कडे जाणार आहे. उडान मध्ये महाशिवरात्रीच्या विशेष भागात, चकोर (मीरा देवस्थळे) तिच्या पतीच्या सूरजसाठी (विजयेंद्र कुमेरिया) शिवदेवाकडून आशिर्वाद मिळविण्यासाठी उपवास करताना दिसणार आहे.पण कमलनारायण (साई बल्लाल) तिच्या या योजनेत खो घालणार आहे आणि सूरजला इतर 7 खेळाडूंसह कबड्डी खेळण्याचे आव्हान देणार आहे. आणि सूरजने खेळ जिंकला तर त्याला नवीन कपडे घेऊन देण्याचे मधाचे बोट कमलनारायण लावणार आहे. खेळ चालू झाल्यावर गोंधळलेली चकोर सूरजच्या विजयासाठी शिवाकडे प्रार्थना करणार आहे. आणि, कर्मफल दाता शनि मध्ये आपण पाहणार आहोत, शिव (तरुण खन्ना) कोपिष्ट होऊन शनिदेवा (कार्तिकेय मालविय) विरुद्ध लढाई पुकारणार आहे, जो त्याच्या आईच्या मृत्युचा सूड घेण्यासाठी देवलोकाचा नाश करण्याच्या निश्चयाने युद्ध पुकारले आहे. शनिच्या निश्चयाने कोपिष्ट झालेला शिव नंदी (समीर खान बॉक्सर) सोबत अनेक लढवय्ये शनिच्या नक्षा उतरविण्यासाठी पाठविणार आहे. तथापि, शनि त्या सर्वांवर मात करून विजयी होणार आहे.दरम्यान शिवाचा संताप इतका उग्र रुप धारण करतो की तो शनिशी लढाई करत असताना जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्याचा तिसरा डोळा उघडणार आहे. ससुराल सिमर का, उडान आणि कर्मफलदाता शनिमधील महाशिवरात्रीचा उत्साह पाहून रसिकही भक्तीरसात मग्न होतील अशी अाशा मालिकेच्या  टीमला आहे.

Web Title: The small screen series 'Sasural Simhara ki', 'Udan' will see Mahashivratri's enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.