n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">मंदना करिमीने क्या कुल है हम 3 या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये प्रवेश केला. तसेच ती बिग बॉस 9 मध्ये झळकली होती. क्या कुल है हम 3 या चित्रपटाचे प्रमोशन न करता ती बिग बॉसच्या घरात गेल्याने एकता कपूरसोबत तिचा वाद झाला होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरात ड्रामा क्वीन ही पदवी तिला मिळाली होती. या सगळ्यामुळे मंदना नेहमीच चुकीच्या कारणांमुळेच चर्चेत राहिली आहे. पण सध्या तिने तिच्या करियरकडे लश्र केंद्रित करायचे ठरवले आहे. बिग बॉस 9मुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळालेली आहे. मंदना इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच गौरव गुप्ता या व्यवसायिकासोबत नात्यात आहे. त्यांच्या नात्याला नुकतीच दोन वर्षं पूर्ण झाली आहेत आणि आता दोघांनी साखरपुडाही केला आहे. मंदनानेच ही बातमी इन्स्टाग्रामद्वारे आपल्या फॅन्सना दिली आहे. तिने त्या दोघांचा फोटोही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.