मेकअपसाठी तब्बल सहा तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 16:37 IST2016-08-24T11:07:55+5:302016-08-24T16:37:55+5:30

ब्रम्हराक्षस - जाग उठा शैतान या मालिकेत पराग त्यागी ब्रम्हराक्षसाची भूमिका साकारत आहे. ब्रम्हराक्षस हा दिसायला अतिशय भयानक आहे. ...

Six hours for makeup | मेकअपसाठी तब्बल सहा तास

मेकअपसाठी तब्बल सहा तास

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal; text-align: justify;">ब्रम्हराक्षस - जाग उठा शैतान या मालिकेत पराग त्यागी ब्रम्हराक्षसाची भूमिका साकारत आहे. ब्रम्हराक्षस हा दिसायला अतिशय भयानक आहे. या व्यक्तिरेखेच्या लूकसाठी टीमने खूप मेहनत घेतली आहे. या लुकसाठी खूप संशोधनही करण्यात आले. या व्यक्तिरेखेच्या मेकअपसाठी परागला कित्येक तास आरशासमोर बसावे लागते. प्रोस्थेटिक मेकअप करायला दोन तास लागतात तर तो मेकअप काढायला 45 मिनिटे लागतात. ही प्रक्रिया दर तीन तासानंतर करावी लागते. त्यामुळे बारा तासांच्या चित्रीकरणात परागचे सहा तास हे मेकअप करण्यात आणि मेकअप काढण्यातच जातात. याविषयी पराग सांगतो, "चित्रीकरण करताना माझा चेहरा ओढला जातो. तर केस अनेकवेळा डोळ्यांवर येतात. तसेच सतत लेन्सेस घातल्याने त्रास होतो. पण हे सगळे असूनही मी ही भूमिका खूप एन्जॉय करतोय."

Web Title: Six hours for makeup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.