'भाभीजी घर पर है'चे 'मनमोहन तिवारी',बघा INSIDE PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 15:22 IST2018-02-08T09:52:55+5:302018-02-08T15:22:55+5:30
प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात.त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो.याला कलाकार मंडळीही ...
.jpg)
'भाभीजी घर पर है'चे 'मनमोहन तिवारी',बघा INSIDE PHOTOS
प रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात.त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो.याला कलाकार मंडळीही अपवाद नसतात.विशेष म्हणजे म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांचीआलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत.सोशल मीडियावर आता टीव्ही कलाकारांच्याही घराचे फोटो व्हायरल होतात.कलाकारमंडळीच आपल्या कुटुंबासह घरातले काही खास क्षण सेलिब्रेट करतानाचे फोटो त्याच्या फेसबुक किंवा इन्स्टाग्रावर शेअर करतात.त्यातुन त्यांच्या घराचे फोटोही चाहत्यांना पाहायला मिळतात.अाता असेच काही खास फोटो रसिकांची पसंती मिळवत आहे.ते म्हणजे 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेत अंगूरी भाभीचा ऑनस्क्रीन पती मनमोहन तिवारीच्या रिअल घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.मनोहन तिवारीचे रिअल नाव रोहिताश्व गौड असे आहे.रोहिताश्वचा गोरेगावमध्ये आलिशान आशियाना आहे.रोहिताश्वने लग्न केल्यानंतर वर्षभरात हा फ्लॅट खरेदी केला होता.2002 रोहिताश्वने लग्न केले.रेखा असे त्याच्या पत्नीचे नाव आहे याच फ्लॅटमध्ये कुटुंबासह रोहिताश्व राहतो.
![]()
![]()
Also Read:आसिफ शेखला अभिनयासोबतच या क्षेत्रात होता रस
विभूती या भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. आसिफ गेली अनेक वर्षं अभिनयक्षेत्रात असला तरी त्याच्या अनेक गोष्टींविषयी त्याच्या फॅन्सना माहीतच नाहीये. आसिफ शेख एक मेहनती अभिनेता असून त्याचे अभिनय कौशल्य नेहमीच वाखाणण्यात आले आहे.पण तुम्हाला माहीत आहे का, की तो चांगला अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला चांगला क्रिकेटरदेखील आहे. आसिफ शेखला क्रिकेट खेळायला फार आवडते. आसिफ शेखने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने छोट्या पडद्यावर आज त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. आसिफने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात करून आज अनेक वर्षं झाली आहेत. हम लोग या प्रसिद्ध मालिकेद्वारे त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो मेहेंदी तेरे नाम की, यस बॉस यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकला. आजवर त्याच्या सगळ्याच भूमिकांचे कौतुक झाले आहे. याचसोबत तो अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्याने पहेली, जोडी नं १, कुवारा, बंधन, प्यार किया तो डरना क्या यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो भाभीजी घर पर है या &TVच्या मालिकेत विभूतीची भूमिका साकारत आहे.