'झलक'च्या निमित्ताने मनीषची चांदी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 12:19 IST2016-07-11T06:49:59+5:302016-07-11T12:19:59+5:30

'झलक दिखला जा' या डान्स रियालिटी शोला सलग पाचव्यांदा होस्ट करण्यासाठी मनीष पॉल सज्ज आहे. गेले ४ सीझन झलक ...

Silver of Manish on the occasion of 'Thakkar'! | 'झलक'च्या निमित्ताने मनीषची चांदी !

'झलक'च्या निमित्ताने मनीषची चांदी !

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'झलक दिखला जा' या डान्स रियालिटी शोला सलग पाचव्यांदा होस्ट करण्यासाठी मनीष पॉल सज्ज आहे. गेले ४ सीझन झलक होस्ट करणा-या मनीषचा भाव यंदा मात्र चांगलाच वधारलाय. या सीझनसाठी मनीषला तब्बल 2.5 कोटी रुपये मिळाल्याचं बोललं जातंय. बॉलीवुड कलाकार जे होस्ट करतात त्यांना वगळल्यास मनीष हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन मिळवणारा टीव्ही होस्ट ठरलाय. मनीषची शो होस्ट करण्याची स्टाईल, कॉमेडी, जजेसोबतची त्याची धम्माल मस्ती यामुळं झलकच्या निर्मात्यांनीही त्याला लगेचच अडीच कोटी मानधन देण्याची तयारी दर्शवलीय.याचाच अर्थ मनीषला आता झलकच्या प्रत्येक भागाचे जवळपास 7 लाख रुपये मिळतील. गेल्या सीझनमध्ये मनीषला दीड कोटी रुपये इतकं मानधन मिळालं होतं.

Web Title: Silver of Manish on the occasion of 'Thakkar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.