/> पडद्यावर रोमँटिक भुमिका साकारणारा आपला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आता पिंडदान करतोय हे ऐकायला थोडा वेगळ वाटतय ना. पिंडदान हा शब्द ऐकुनच अंगावर शहारा येतो, मग असे काय झालेय कि सिद्धार्थ पिंडदान करतोय हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर जरा थांबा. तो पिंडदान नावाचा सिनेमा घेऊन लवकरच त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. नावावरुन सिनेमाचा विषय जरी गंभीर वाटत असेल तरी ही एक लव स्टोरी असल्याचे सिद्धार्थने सीएनएक्सला दिलेल्या एका इंटरव्ह्यु मध्ये सांगितले आहे. सिद्धार्थ म्हणतोय, पिंडदान ही अतिशय वेगळी प्रेमकहाणी आहे. मनवा नाईक सोबत प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येत असल्याने खुप एक्साईटमेंट आहे. मनवा एक उत्तम डिरेक्टर आणि अॅक्टर आहे. सेटवर काम करताना आम्हाला खुपच मजा आली. चित्रपटाच्या कथेविषयी तो सांगतोय कि, आम्ही लंडनमध्ये राहत असतो आणि पिंडदान नावाच्या एका डॉक्युमेंटरीसाठी दोघेही भारतात येतो. आणि मग कथेला पुढे सुरुवात होतो. सिद्धार्थने कथेविषयी सस्पेन्स ठेवला असल्याने त्याच्या चाहत्यांची आता पिंडदान विषयी नक्कीच क्युरियासिटी वाढली असणार यात शंका नाही.