सिद्धार्थ शुक्ला आणि अंकिता शर्मा यांना झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2017 13:24 IST2017-06-19T07:54:10+5:302017-06-19T13:24:10+5:30

दिल से दिल तक या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई प्रमुख भूमिका साकारत आहे. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच ...

Siddharth Shukla and Ankita Sharma were injured | सिद्धार्थ शुक्ला आणि अंकिता शर्मा यांना झाली दुखापत

सिद्धार्थ शुक्ला आणि अंकिता शर्मा यांना झाली दुखापत

ल से दिल तक या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई प्रमुख भूमिका साकारत आहे. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे तर एक शृंगार स्वाभिमान या मालिकेत प्राची शाह, अंकिता शर्मा, संगीता चौहान मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. या दोन मालिकांचा मिळून एक महासंगम एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या भागाचे चित्रीकरण करत असताना नुकताच एक अपघात घडला.
दिल से दिल तक आणि स्वाभिमान या दोन्ही मालिकेतील कलाकार मुंबईतील एका भागात चित्रीकरण करत होते. पण चित्रीकरण करत असताना सिद्धार्थ शुक्ला आणि अंकिता शर्मा यांना चांगलीच दुखापत झाली. मालिकेतील एका दृश्यात पार्थ म्हणजेच सिद्धार्थ आणि नैना म्हणजेच अंकिता शर्मा एका कॉफी शॉपमध्ये भेटतात. पण तेव्हाच कॉफी शॉपला आग लागते आणि प्रचंड गोंधळ उडतो, लोक सैरावैरा धावू लागतात. आगीमुळे पार्थ आणि नैनादेखील तिथून पळतात. पण पळताना ते दोघे एका खड्ड्यात पडतात असे दाखवायचे होते. पण हे दृश्य चित्रीत करत असताना सिद्धार्थ आणि अंकिता यांना चांगलीच दुखापत झाली. यात सिद्धार्थच्या पायाला जखम झाली तर अंकिताच्या कोपऱ्याला लागले. दोघांनाही चांगलीच जखम झाली होती. सिद्धार्थचा पाय आणि अंकिताचा हात खूपच दुखत असल्याने मालिकेचे टीम चांगलीच घाबरली होती. यामुळे मालिकेचे चित्रीकरण काही वेळासाठी थांबवण्यात आले. पण आपल्यामुळे मालिकेच्या टीमचा वेळ जाऊ नये यासाठी अंकिता आणि सिद्धार्थने लगेचच पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली. 

dil se dil tak sidharth shukla

Web Title: Siddharth Shukla and Ankita Sharma were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.