n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">हिप हिप हुर्रे, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट, झलक दिखला जा यांसारख्या कार्यक्रमात झळकलेली अभिनेत्री श्वेता साळवीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. श्वेताने व्यवसायिक हरमीत सेठीसोबत 2012मध्ये विवाह केला होता. लग्नानंतर श्वेता छोट्या पडद्यापासून दूर होती. श्वेताने तिच्या गरोदरपणात केलेले फोटोशूट चांगलेच गाजले होते. व्हिजे निखिल चिन्नपाने ट्विटवरून ही बातमी दिली. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "माझी मैत्रीण श्वेता आणि हरमीत आता एका मुलीचे आई-वडील बनले आहेत. माझे ट्वीट वाचल्या वाचल्या लगेचच त्यांना फोन करून सगळ्यांनी अभिनंदन करा."