शुभांगी अत्रे, फरनाझ शेट्टी आणि सिमरन कौर यांनी केले ससुराल गेंदा फूलवर नृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 11:57 IST2017-10-11T06:27:04+5:302017-10-11T11:57:04+5:30
दिवाळीची लगबग सध्या सगळीकडे सुरू झाली आहे. शॉपिंगला कुठे जायचे, काय काय घ्यायचे याच्या चर्चा सगळीकडे रंगत आहेत. तसेच ...

शुभांगी अत्रे, फरनाझ शेट्टी आणि सिमरन कौर यांनी केले ससुराल गेंदा फूलवर नृत्य
द वाळीची लगबग सध्या सगळीकडे सुरू झाली आहे. शॉपिंगला कुठे जायचे, काय काय घ्यायचे याच्या चर्चा सगळीकडे रंगत आहेत. तसेच घरातील बायका वेळात वेळ काढून फराळ बनवत आहेत. दिवाळीत एकमेकांना गिफ्ट देखील दिले जाते. त्यामुळे या गिफ्टची शॉपिंग देखील लोक करत आहेत. या सगळ्यामध्ये छोट्या पडद्यावर देखील विशेष कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. विविध वाहिन्या आपल्या फॅन्ससाठी कार्यक्रम आयोजित करत आहेत. या दिवाळीत अँड टीव्हीने आपल्या प्रेक्षकांसाठी विशेष सरप्राइज आणले आहे. या वाहिनीने आपल्या सर्व मालिकातील सूनांना एकत्र एकाच व्यासपीठावर आणले आहे․ या सूना आपल्याला या कार्यक्रमात एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहेत. अँड या वाहिनीवरील अंगूरी भाभी, प्रीत आणि सृष्टी या तीन सूना लोकांसमोर आपली नृत्यकला सादर करणार आहेत. आपला डान्स अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांनी आपल्या चित्रीकरणाच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून नृत्याच्या तालमी देखील केल्या आहेत. या विशेष कार्यक्रमाचे नुकतेच चित्रीकरण झाले. या चित्रीकरणासाठी त्यांनी खूप चांगले कपडे परिधान केले होते. पारंपरिक लेहंगांमध्ये त्या तिघीही खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांनी आपल्या नृत्याद्वारे स्टेजवर धमाल उडवून दिली. शुभांगी अत्रे, फरनाझ शेट्टी आणि सिमरन कौर या किती व्यावसायिक आणि परफेक्शनिस्ट आहेत हे त्यावेळी दिसून आले. जोपर्यंत त्यांचे नृत्य चांगले होत नाही, तोपर्यंत त्यांनी अनेक रिटेक घेतले.
‘ससुराल गेंदा फूल’ या गाण्यावर शुभांगी, फरनाझ आणि सिमरन या तिघींनीही खूप चांगला परफॉर्मन्स सादर केला. आपला परफॉर्मन्स अधिक चांगला होण्यासाठी त्यांनी एकमेकींना नवनवीन स्टेप सुचवल्या. एकूण १० रिटेक घेतल्यावरच त्यांना आपल्या आवडीचा फायनल टेक मिळाला. आपण आपल्यातील सर्वोत्तम दिले आहे असे त्यांना वाटत असल्याने त्या खूपच समाधानी होत्या. या नृत्यामुळे त्या तिघींची खूपच चांगली गट्टी जमली असून त्यांची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना परफॉर्मन्स मध्ये देखील दिसून येणार आहे.
Also Read : अंगुरी भाभी उर्फ शुभांगी अत्रेला येतायेत प्रचाराच्या ऑफर्स