n lang="MR" style="color: rgb(34, 34, 34); font-size: 12.8px; font-family: mangal, serif;">विभूतीजींची अवस्था तर आता आज मैं ऊपर आसमाँ नीचे अशीच काहीशी झाली आहे. कारण विभूतींजींचे स्वप्न आता साकार होणार आहे. अंगुरीला (शुभांगी अत्रे) आपली जोडीदार बनवण्याचे विभूतीजींचे स्वप्न आता खरं होणार आहे. 'भाभीजी घर पर है' ही मालिका आता सर्वोच्च शिखरावर असून विभूती आणि अंगुरी रेशीमगाठीत अडकणार आहेत. मात्र हे सारे नाट्य घडणार आहे ते अंगुरीच्या आजीमुळे. बराच काळात कोमात राहिल्यानंतर अंगुरीची आजी शुद्धीवर येऊ लागते. आपण सांगितलेल्या मुलाशीच अंगुरीने लग्न करावे अशी तिच्या आजीची इच्छा असते.त्यानंतर लग्नाची मागणी घालण्यासाठी विभूती तिवारीसह आजीकडे येतात. मात्र त्यावेळी आजी तिवारीऐवजी अंगुरीचा नवरदेव म्हणून विभूतींजीची निवड करते. आजीचा निर्णय ऐकून सा-यांनाचा आश्चर्याचा धक्का बसतो. मात्र आजीला खुश करण्यासाठी आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी अंगुरी विभूतींजीसह लग्नला तयार होते. या निर्णयामुळे तर विभूतींजींची अवस्था आनंदी आनंद गडे अशीच झाली आहे. तर तिकडे तिवारीजी मात्र या निर्णयाने दुःखी झालेत. आता अंगुरी आणि विभूती खरंच रेशीमगाठीत अडकणार का
? दोघांच्या लग्नाच्या निमित्ताने आणखी कोणते ट्विस्ट येणार का ? याची रसिकांना उत्सुकता लागली आहे.
Web Title: Shubhamangal of Vibhuti and Gangura?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.