अभिनेत्री नसूनही श्रेयस तळपदेची पत्नी दिसतेय इतकी सुंदर की, तिच्या सौंदर्यापुढे अभिनेत्रीही पडतील फिक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 17:51 IST2021-08-02T17:43:17+5:302021-08-02T17:51:09+5:30
करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी दीप्ती पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि आपला विश्वास कधीही ढळू दिला नाही असं श्रेयस सांगतो. जीवनात जे काही यश मिळाले ते फक्त दीप्ती ठामपणे पाठिशी उभी राहिल्याने आणि तिने साथ दिल्याने असे तो अभिमानाने सांगतो.

अभिनेत्री नसूनही श्रेयस तळपदेची पत्नी दिसतेय इतकी सुंदर की, तिच्या सौंदर्यापुढे अभिनेत्रीही पडतील फिक्या
"माझी तुझी रेशीमगाठ" या मालिकेतून श्रेयस पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आणि या मालिकेची झलक पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेचं कथानक वेगळं असून एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. श्रेयस तळपदेला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी रसिकही उत्सुक आहेत.
श्रेयस तळपदे सोशल मीडियावर श्रेयस प्रचंड सक्रीय असतो. त्याचे नवीन प्रोजेक्ट कुटुंबासोबतचे खास क्षण तो चाहत्यांसह शेअर करत असतो. पत्नी दीप्तीसोबत फोटो शेअर करत कपल गोल देत असतो. त्याच्या या फोटोंनाही प्रचंड पसंती मिळते.दीप्ती खंबीरपणे श्रेयसच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते. दुसरीकडे श्रेयसही आपल्या सगळ्या यशाचे श्रेय दीप्तीलाच देतो.
दीप्ती दिसायला खूप सुंदर आहे. कोणत्याही अभिनेत्रीला लाजवेल इतकी दीप्ती सुंदर दिसते. दीप्तीने सायकॉलॉजीचे शिक्षण घेतले आहे. रिअल लाईफमध्ये दीप्ती अतिशय मनमौजी अशीच आहे. या दोघांना एक मुलगी आहे. मुलीचे नाव आद्या तळपदे असे आहे. अनेकदा दोघेही मुलीसोबतचे क्युट फोटोही शेअर करताना दिसतात.
करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी दीप्ती पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि आपला विश्वास कधीही ढळू दिला नाही असं श्रेयस सांगतो. जीवनात जे काही यश मिळाले ते फक्त दीप्ती ठामपणे पाठिशी उभी राहिल्याने आणि तिने साथ दिल्याने असे तो अभिमानाने सांगतो. दुसरीकडे दीप्तीसुद्धा श्रेयसचं कौतुक करताना थकत नाही.
दोघांमध्ये कितीही भांडणं झाली तरी काही क्षणात ते विसरतो असं ती सांगते. कितीही कडाक्याचे भांडण झालं तरी नव्या दिवसाची सुरुवात गोड बोलून करतो आणि तेच आपल्या यशस्वी नात्याचे गमक आहे असल्याचे हे रोमँटिक कपल सांगते.