मुंबईच्या ट्राफिकमध्ये तब्बल ५ तास अडकली श्रेया बुगडे, वैतागून म्हणाली- "आता रस्त्यावरच फूड स्टॉल, शॉपिंग सुरू करा..."
By कोमल खांबे | Updated: October 13, 2025 13:33 IST2025-10-13T13:32:51+5:302025-10-13T13:33:11+5:30
मुंबईच्या ट्राफिकला श्रेया बुगडेही वैतागली आहे. श्रेया तब्बल ५ तास ट्राफिकमध्ये अडकली होती. यानंतर वैतागून तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे.

मुंबईच्या ट्राफिकमध्ये तब्बल ५ तास अडकली श्रेया बुगडे, वैतागून म्हणाली- "आता रस्त्यावरच फूड स्टॉल, शॉपिंग सुरू करा..."
घराबाहेर कामानिमित्त पडलेल्या मुंबईकरांना दररोज ट्राफिकचा सामना करावा लागतो. अनेक तक्रारी करूनही यात काहीही सुधारणा होत नाही. अनेक सेलिब्रिटीही याबाबत तक्रार करताना दिसतात. आता मुंबईच्या ट्राफिकला श्रेया बुगडेही वैतागली आहे. श्रेया तब्बल ५ तास ट्राफिकमध्ये अडकली होती. यानंतर वैतागून तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे.
इन्स्टास्टोरीमध्ये श्रेयाने म्हटलं आहे की "मुंबईतील ट्राफिकची परिस्थिती पाहता...मी सल्ला देऊ इच्छिते की रस्त्यावर फूड स्टॉल, शॉपिंग, बुक स्टॉल सुरू करावेत. जेणेकरून घरी किंवा ऑफिसला जाताना ट्राफिकमध्येच अडलेल्या लोकांना रस्त्यावरच खाता येईल, शॉपिंग करता येईल, वाचला येईल आणि गाणीही ऐकता येईल. कृपया करून सार्वजनिक शौचालयांचीही व्यवस्था करा. - ५ तास ट्राफिकमध्ये अडकलेला एक हताश आणि लाचार मुंबईकर".
दरम्यान, श्रेया बुगडे ही मराठी इंडस्ट्रीतील कॉमेडी क्वीन आहे. श्रेयाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. चला हवा येऊ द्या या शोमुळे ती घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनात पोहोचली. आता श्रेया चला हवा येऊ द्या या शोमध्ये परिक्षक म्हणून काम करते आहे.