घरगुती हिंसाचारामुळे या अभिनेत्रीचा दोनदा मोडला संसार, गरोदर असतानाही पती करायचा मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 06:00 AM2020-08-27T06:00:00+5:302020-08-27T06:00:00+5:30

घरगुती हिंसाचारामुळे हा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. स्वतः चाहत खन्नाने याचा खुलासा केला होता.

Shocking When Chahatt Khanna's Husband used to beat her during pregnancy | घरगुती हिंसाचारामुळे या अभिनेत्रीचा दोनदा मोडला संसार, गरोदर असतानाही पती करायचा मारहाण

घरगुती हिंसाचारामुळे या अभिनेत्रीचा दोनदा मोडला संसार, गरोदर असतानाही पती करायचा मारहाण

googlenewsNext

रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री चाहत खन्नाचंही नाव जोडलं जातं. चाहतने आजपर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

चाहतचे अॅक्टींग करिअर सुरळीत सुरू असले तरी वैवाहीक आयुष्यात मात्र तिच्या वाट्याला निराशाच आली. चाहतने एकदा नाही तर दोनदा लग्न केले. मात्र दोन्ही लग्न फार काळ टिकली नाहीत. खुद्द चाहतने याबाबत खुलासा केला होता. २००६ मध्ये तिने भारत नारा सिंघानीसोबत लग्न केले होते. पण एका वर्षानंतर तिने भारतला घटस्फोट दिला. पुन्हा २०१३ मध्ये तिने फरहान मिर्झाशी लग्न केले. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. फरहानलाही घटस्फोट देत वेगळी झाली होती.

घरगुती हिंसाचारामुळे हा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. स्वतः चाहतने याचा खुलासा केला होता. फरहान सतत तिला मारहाण करायचा. ती गरोदर असल्याचे माहिती असूनही तो तिला मारायचा आणि खोलित बंदिस्त करून ठेवायचा. या सगळ्या काळात आपण भेदरल्याचे तसंच खचून गेल्याचंही चाहतने नमूद केले होते. चाहतला दोन मुली आहेत. या नात्यामधून वेगळी होत आता चाहत आनंदी जीवन जगत आहे. 

चाहत सोशल मीडियावर जास्त वापर करत नाही. गरजे पुरताच ती सोशल मीडियावर अॅक्टीव दिसते. बनावट आयुष्यात रमण्या पेक्षा वास्तविक जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत आयुष्य जगण्यात खरा आनंद असल्याचे तिने म्हटले होते.  

Web Title: Shocking When Chahatt Khanna's Husband used to beat her during pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.