'रंग माझा वेगळा'मध्ये धक्कादायक वळण, दीपा तोडणार कार्तिकसोबतचं नातं, परत करणार त्याला मंगळसूत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 13:35 IST2022-06-20T13:35:23+5:302022-06-20T13:35:42+5:30
Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेत आयेशासोबत लग्न करण्यासाठी दीपाने कार्तिकला घातली शपथ.

'रंग माझा वेगळा'मध्ये धक्कादायक वळण, दीपा तोडणार कार्तिकसोबतचं नातं, परत करणार त्याला मंगळसूत्र
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर स्थानावर आहे. या मालिकेत सातत्याने येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता मालिकेत धक्कादायक वळण आले आहे. एकीकडे मालिकेत सौंदर्या, कार्तिकी आणि दीपिका कार्तिक आणि दीपाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे आता दीपाच आयशाच्या डावात अडकून कार्तिकसोबतचे नाते तोडणार आहे.
मालिकेत नुकतेच पाहायला मिळालं की, लग्नासाठी कोर्टात कार्तिक न गेल्यामुळे आयशा कार्तिकविरोधात तक्रार दाखल करते. कार्तिकला अटक होते आणि कोर्टात कार्तिक विरोधात आयशा सर्व पुरावे सादर करते. त्याला शिक्षा होणार असते तितक्यात तिथे दीपा पोहचते आणि यापूर्वीही आयशाने अशीच तक्रार दुसऱ्या व्यक्तीची केली असे सांगते. त्यामुळे कार्तिकची निर्दोष मुक्तता होते. मात्र आयशा दीपाकडे जाऊन तिला नको नको ते बोलते. ती तिच्या जीवाचं बरे वाईट करेल म्हणून दीपाच तिला कार्तिकसोबत तिचे लग्न लावून देण्याचे वचन देते.
दरम्यान आता नवीन प्रोमो समोर आला आहे, त्यात पाहायला मिळत आहे की, दीपा कार्तिकला बोलताना दिसते आहे की तुझं आणि आय़शाचे लग्न होत नाही, त्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटतं. तुमच्या दोघांचं लग्न होत नाही, त्याच्यात माझा काहीच दोष नाही. कार्तिक आपल्यात जे काही उरलं होतं. ते परत करायचं आहे. दीपा गळ्यातलं मंगळसूत्र काढून कार्तिकला देत म्हणते तुला या मंगळसूत्राची शपथ तू आयशाची लग्न कर. दीपाचे हे म्हणणे ऐकल्यावर कार्तिक काय निर्णय घेईल, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.