Shocking : ​‘या’ कारणाने एकता कपूरने अद्याप केले नाही लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 16:40 IST2017-06-27T11:10:38+5:302017-06-27T16:40:38+5:30

सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्रची मुलगी आणि तुषार कपूरची बहीण तथा बालाजी टेलिफिल्म्सची रचनात्मक प्रमुख एकता कपूर ४२ वर्षाची झाली असून ...

Shocking: 'This' marriage due to unity Kapoor has not yet done! | Shocking : ​‘या’ कारणाने एकता कपूरने अद्याप केले नाही लग्न !

Shocking : ​‘या’ कारणाने एकता कपूरने अद्याप केले नाही लग्न !

प्रसिद्ध अभिनेते जितेंद्रची मुलगी आणि तुषार कपूरची बहीण तथा बालाजी टेलिफिल्म्सची रचनात्मक प्रमुख एकता कपूर ४२ वर्षाची झाली असून अद्यापही अविवाहित आहे. एकदा तिला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘तिचा भाऊ तुषार आणि बेस्ट फ्रेंड करण जोहर वडील (सेरोगेसी द्वारे) बनले आहेत. तुला पॅरेंट बनण्याची इच्छा होत नाही का?’  तेव्हा एकता म्हणाली होती, माझ्या पॅरेंट्सनाही तसे वाटते. पण असे कधी शक्य होईल माहिती नाही. मी सध्या फार बिझी आहे. पुढे ती म्हणाली की, ‘मी त्या महिलांचा सन्मान करते ज्या कामाबरोबर घरही मॅनेज करतात. मला मुलाच्या प्लानिंगआधी आयुष्याचे प्लानिंग करण्याची गरज आहे.’
एक ताला लग्नाबाबतही विचारण्यात आले होते, तेव्हा ती म्हणाली होती की, ‘माझ्या जेवढ्या मित्रांनी लग्न केले होते, ते सर्व आता अविवाहित आहेत. गेल्या काही दिवसांत मी फार घटस्फोट पाहिले आहेत. मला वाटते माज्यात खूप संयम आहे, कारण मी अजूनही सर्वांची वाट पाहत आहे, शिवाय मला एक गोष्ट माहिती आहे की, मला बाळ पाहिजे पण लग्न करायचे नाही. माहिती नाही का, पण माझ्याकडे स्वत:साठी वेळ नाही. काही तासांचा वेळ मिळालाच तर मला स्पामध्ये जायला आवडेल.’
एकता कपूर टीव्हीवरील सर्वात यशस्वी निर्माती आहे. सध्या तिचे 'कसम तेरे प्यार की', 'चंद्रकांता', 'ये है मोहब्बते', 'चंद्रनंदिनी', 'ढाई किलो प्रेम', 'परदेस मे है मेरा दिल' आणि 'कुमकुम भाग्य' असे अनेक सो टीव्हीवर सुरू आहेत. 

Also Read : ​सुशांत सिंह राजपूत व एकता कपूरचा ‘पवित्र रिश्ता’ अद्यापही कायम!

Web Title: Shocking: 'This' marriage due to unity Kapoor has not yet done!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.