शॉकिंग : मनू पंजाबी का गेला बिग बॉस अर्ध्यावर सोडून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 16:20 IST2016-12-03T16:00:07+5:302016-12-03T16:20:20+5:30

बिग बॉसच्या घराला जणू काही गळतीच लागली आहे. स्वयंघोषित बाबा ओम स्वामी आणि एलिना कझानच्या एक्झिटनंतर मनू पंजाबीसुद्धा शो ...

Shocking: Manu went to the Punjabi bar, leaving the Big Boss halfway? | शॉकिंग : मनू पंजाबी का गेला बिग बॉस अर्ध्यावर सोडून?

शॉकिंग : मनू पंजाबी का गेला बिग बॉस अर्ध्यावर सोडून?

ग बॉसच्या घराला जणू काही गळतीच लागली आहे. स्वयंघोषित बाबा ओम स्वामी आणि एलिना कझानच्या एक्झिटनंतर मनू पंजाबीसुद्धा शो अर्ध्यावर सोडून बाहेर पडला आहे. बरं तो काही एलिमिनेट नाही झाला.

सुत्रांनुसार, कौटुंबिक कारणासाठी त्याने बिग बॉसचे घर सोडले आहे. एका रिपोर्टनुसार त्याच्या आईचे निधन झाल्याचे कळतेय; परंतु अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

बिग बॉसच्या दहाव्या पर्वाला सुरुवातीपासूनच संकटांना सामना करावा लागत आहे. एकाच आठवड्यात तीन-तीन स्पर्धक सोडून चालल्याने शोच्या लोकप्रियतेविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

विशेष म्हणजेविकेंड स्पेशल एपिसोडमध्ये मनूची होणारी पत्नी प्रिया सैनी हजेरी लावणार होती. मनू आणि मोनाची वाढती सलगी पाहता त्यांचे अफेअर सुरू असल्याची चर्चा आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी ती मोनाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूतसह येणार होती. पण आता मनूच बाहेर पडल्यामुळे ती येणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.


लव्ह अफेयर? : मनू पंजाबी आणि मोन लिसा

या आठवड्यात सर्वप्रथम स्वामी ओम त्यांच्या विरोधात निघालेल्या अजामीनपात्र वॉरंटमुळे घरातून बाहेर पडले. त्यांच्यावर दाखल असलेल्या चोरीच्या खटल्याची आज (दि. ३ डिसेंबर) सुनवणी आहे. मुख्य महानगर दंडाधिकाºयांनी त्यांना उपस्थित राहणे बंधनकारक केल्यामुळे त्यांना बिग बॉसला टाटा करावे लागले.

वाईल्ड कार्ड एन्ट्री एलिना कझानला प्रेक्षकांनी व्होटिंग करून घरा बाहेर केले. मागच्या रविवारी घरात दाखल झालेल्या कझानचा बिग बॉसमध्ये सात दिवसही निभाव लागू शकला नाही. तिच्या थंड कामगिरीमुळे लोकांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवला. ‘डोम चॅलेंज’मध्ये असफल ठरल्यामुळे तिला राहुल देव, व्हीजे बानी, जेसन शहासह एलिमिनेशनसाठी नामांकित करण्यात आले होते.

Web Title: Shocking: Manu went to the Punjabi bar, leaving the Big Boss halfway?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.