n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरचा वाढदिवस नुकताच झाला. त्याचा हा खास दिवस त्याला त्याच्या कुटुंबियांसमवेत साजरा करायचा होता. त्यामुळे तो मझाक मझाक या कार्यक्रमाच्या चित्रीकरणातून काही दिवसांचा ब्रेक घेऊन पाकिस्तानला गेला होता. पण पाकिस्तानवरून परत आल्यावर त्याचा वाढदिवस मझाक मझाकच्या टीमने सेटवर साजरा केला. शोएबला त्यांनी एक सरप्राईज दिले. याबाबत शोएब सांगतो, "कार्यक्रमाचे चित्रीकरण झाल्यानंतर आम्ही सगळे घरी जायला निघालो होतो. तेवढ्यात एका भला मोठा केक माझ्यासमोर आणण्यात आला. कार्यक्रमातील स्पर्धक आणि सगळ्या टीमने मिळून माझ्यासाठी हा केक आणला होता. हा केक पाहून मी खूपच खूश झालो. माझ्या वाढदिवसाचे इतके चांगले सेलिब्रेशन केल्याबद्दल मी संपूर्ण टीमचा आभारी आहे."