Shiv Thakare : 'विणाने लग्नाचं नाटक....' शिव ठाकरे एक्स गर्लफ्रेंडबाबत स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 09:12 AM2023-02-26T09:12:02+5:302023-02-26T09:12:35+5:30

मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात नाव कमावणारा 'बिग बॉस' फेम शिव ठाकरे चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

shiv thakare makes clear statement about ex girlfriend veena jagtap | Shiv Thakare : 'विणाने लग्नाचं नाटक....' शिव ठाकरे एक्स गर्लफ्रेंडबाबत स्पष्टच बोलला

Shiv Thakare : 'विणाने लग्नाचं नाटक....' शिव ठाकरे एक्स गर्लफ्रेंडबाबत स्पष्टच बोलला

googlenewsNext

Shiv Thakre : मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात नाव कमावणारा 'बिग बॉस' फेम शिव ठाकरे चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मराठी बिग बॉसचे विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने हिंदी बिग बॉसमध्येही उत्तम खेळी करत नाव कमावले. सध्या तो चाहत्यांचा लाडका आहे. नुकतीच शिवने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. शिवची आता राजकारणातही एंट्री होणार का अशी चर्चा सुरु झाली. दरम्यान मराठी बिग बॉसमध्ये शिव आणखी एका कारणाने चर्चेत आला होता ते म्हणजे त्याची आणि विणाची लव्हस्टोरी.

बिग बॉसमध्ये असताना शिव आणि विणाची ओळख झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. बाहेर आल्यानंतरही त्यांचे नाते बराच काळ टिकून होते. मात्र काही कारणाने त्यांची ताटातूट झाली. दरम्यान शिवच्या आईला जेव्हा विणाबद्दल विचारण्यात आले तेव्हा विणा हा विषय आमच्यासाठी संपला आहे असं त्या म्हणाल्या होत्या. तिने शिवची कायम साथ दिली मात्र नंतर तिने लग्नाचे नाटक केले म्हणून आता तो विषय कायमचा संपला आहे. 

Shiv Thakare : मी आहे सोबत नेहमी..., रडणाऱ्या शिव ठाकरेसाठी वीणा जगतापची स्पेशल पोस्ट

आईच्या त्याच वक्तव्यावर शिव स्पष्टीकरण देताना शिव म्हणाला, 'विणाने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आम्ही कायम एकमेकांचा कायम आदर करतो. काही कारणांनी आमचं नातं पुढे जाऊ शकलं नाही. आपला मुलगा आनंदात राहावा असं प्रत्येक आईला वाटतच असतं. लग्न ठरवताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. मी अमरावतीचा मुलगा आहे जात अशा अनेक गोष्टी होत्या. त्यामुळे वीणाने लग्नाचं नाटक केलेलं नाही.'

शिव लवकरच रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी' या शो मध्ये दिसणार आहे.तर त्याला सलमान खानने सिनेमा ऑफर केल्याचीही चर्चा आहे. मी लवकरच एका सिनेमात दिसेन असं शिवने मान्यही केलं आहे. बिग बॉसमुळे शिवचे नशीबच उजळले आहे.

Web Title: shiv thakare makes clear statement about ex girlfriend veena jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.