शिल्पा शिंदेचा बिग बॉसच्या घरातला भाभीपासून आई पर्यंतचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 17:03 IST2017-12-26T11:30:41+5:302017-12-27T17:03:33+5:30
काही वर्षांपासून छोट्या पडद्यावर असंख्य भूमिका आणि व्यक्तिरेखांमधून शिल्पा चमकत आली आहे. लाडकी भाभी साकारल्या नंतर तिला प्रसिद्धी मिळाली ...
.jpg)
शिल्पा शिंदेचा बिग बॉसच्या घरातला भाभीपासून आई पर्यंतचा प्रवास
lass="m_5418570926273411451m_805892734413218441m_-403570110840513003m_5192654038259708977gmail-m_-7610723165921288608gmail-MsoNormal" style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; margin-bottom: 6pt; line-height: normal;">काही वर्षांपासून छोट्या पडद्यावर असंख्य भूमिका आणि व्यक्तिरेखांमधून शिल्पा चमकत आली आहे. लाडकी भाभी साकारल्या नंतर तिला प्रसिद्धी मिळाली आणि मग शिल्पा शिंदेचे नाव प्रसिद्ध झाले. या वर्षी, बिग बॉस 11 मधील तिचा प्रवास वर्तमानपत्रांची हेडलाइन बनली आहे.
बिग बॉस हाऊसच्या पहिल्या विस्फोटक वीकमध्ये शिल्पाने प्रेक्षकांना तिची धैर्यवान आणि आक्रमक बाजू दाखविली होती. पण, काही काळानंतर ती घरामध्ये स्थिर झाली आणि तिने आईची भूमिका अंगिकारली आणि पालनपोषणाची गुणवत्ता दाखवली. किचनची जबाबदारी स्विकारून शिल्पाने बिग बॉसच्या घरातील प्रत्येकाला चांगले जेवण मिळेल याची काळजी घेतली. मेगास्टार सलमान खानचे सुद्धा त्याकडे लक्ष गेले आणि त्याने तिच्या नावाचा उल्लेख बिग बॉस हाऊस 11 की माँ असा केला. तिने बनविलेल्या 6000 चपात्यांचा विनोद व्हायरल झाला आहे.
तिचे विकास सोबत झालेल्या भांडणाने प्रत्येकजण सावध झाला होता, पण तिच्या क्षमाशील आणि समजूतदार स्वभावामुळे विकासने त्याच्या मागील वर्तनाविषयी माफी मागितली आणि त्या दोघांनी तो वाद संपवला. विकासने तर त्याच्या आगामी सिनेमामध्ये शिल्पाला भूमिका ऑफर केली आहे. अर्शीच्या सुटकेसाठी शिल्पा गेली होती, तरीही तिने शिल्पाच्या बाजूला जास्त वेळ न राहण्याचा निर्णय घेतला आणि मैत्री चंचल असते ही गोष्ट अर्शी खानने सिद्ध केली आहे.
2 महिन्यानंतर शिल्पाची सख्खी आई तिला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात आल्याने शिल्पा आश्चर्यचकित झाली होती. तिच्या प्रेमळ आणि केअरिंग स्वभावामुळे घरातल्यांचे मन तिने जिंकले आहे आणि सलमान खानने सांगितले की दिवसांदिवस तिच्यातील आईचे गुण वाढत चालले आहेत. एलिमिनेशन पासून खूप वेळा वाचलेल्या शिल्पाने सिद्ध केले आहे की ती प्रेक्षकांची लाडकी आहे.
मागील जवळपास 15 वर्षांपासून शिल्पा या इंडस्ट्री मध्ये आहे. पण एकदा बोलताना ती म्हणाली आहे, “ होय, माझ्या आधीच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या होत्या. पण मला असे वाटते की बिग बॉसने माझ्यातील खरी शिल्पा बाहेर काढली आहे.”
फिनाले लवकरच जवळ येत चालला आहे, शिल्पाला अजून खूप लांब वाटचाल करायची आहे आणि लवकरच महाराष्ट्रातील प्रेक्षक तिला बिग बॉसच्या विजेतीच्या रुपात पाहतील.