शिल्पा शिंदे बनणार नाही 'बिग बॉस 11' हिस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 18:06 IST2017-09-01T12:29:59+5:302017-09-01T18:06:26+5:30

सप्टेंबरमध्ये सुरु होणाऱ्या सलमान खानच्या मोस्टअव्हेटेड बिग बॉसच्या 11 व्या सीजनचा प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग ...

Shilpa Shinde will not become the 'Big Boss 11' part | शिल्पा शिंदे बनणार नाही 'बिग बॉस 11' हिस्सा

शिल्पा शिंदे बनणार नाही 'बिग बॉस 11' हिस्सा

्टेंबरमध्ये सुरु होणाऱ्या सलमान खानच्या मोस्टअव्हेटेड बिग बॉसच्या 11 व्या सीजनचा प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बॉसचा प्रोमोदेखील रिलीज करण्यात आला आहे. ज्यातनंतर बिग बॉसच्या घरात कोणकोण दिसणार या गोष्टीबाबत चर्चा सुरू झाली आहे. या शोशी रिलेटेड आणखीन एक गोष्टसमोर आली आहे. भाभीजी घर पे हैमधील कंट्रोवर्शियल अंगूरी भाभी अर्थात शिल्पा शिंदे या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे. याआधी बिग बॉसच्या घरात जाणांऱ्याच्या यादीत शिल्पाचे नाव फायनल करण्यात आले होते. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी शिल्पाने एक मोठी रक्कम बिग बॉसच्या मेकर्सकडे मागितली होती. शिल्पाची ही मागणी पूर्ण सुद्धा करण्यात आली होती. मात्र आता अशी बातमीसमोर येतेय शिल्पाने या कार्यक्रमाचा हिस्सा बनण्यापासून नकार दिला आहे.    

शिल्पाने दिलेल्या एका इंटरव्ह्यु दरम्यान सांगितले की, ती 'बिग बॉस 11'मध्ये सहभागी होणार नाही आहे.पुढे शिल्पा म्हणाली, आता तिला टीव्हीवर काम करण्याची इच्छा नाही आहे. मी छोट्या पडद्याचा खूप आदर करते पण मला आता डेली सोपमध्ये काम करायचे नाही. बिग बॉसच्या मेकर्सकडून शिल्पाला शोमध्ये सहभागी होण्यासाठी अप्रोच करण्यात आल्याचे तिने सांगितले. मात्र 24 तास मी कोणत्याच शोमध्ये राहु शकत नाही. मी शोमध्ये सहभागी होण्यासाठी एक मोठी रक्कम मागितल्याच्या बातम्या सध्या चालू आहेत मात्र त्या केवळ अफवाह असल्याचे शिल्पाने स्पष्ट केले. शिल्पाने एका मालिकेच्या निर्मात्यावर यौन शोषणाचा आरोप केला होता त्यानंतर ती चर्चेत आली होती आणि त्यांनतर अनेक दिवस शिल्पा मीडियात चर्चेचा विषय बनून राहिली होती.       

Web Title: Shilpa Shinde will not become the 'Big Boss 11' part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.