नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण करणा-या शिल्पा शिंदेला रेपची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 03:01 PM2019-02-26T15:01:33+5:302019-02-26T15:02:19+5:30

शिल्पा शिंदेकडे सध्या कुठलेही काम नाही. पण आपल्या उलटसुलट वक्तव्यांमुळे चर्चेत राहण्याचे काम मात्र ती चोख बजावतेय.  चर्चेत येण्याची एकही संधी शिल्पा सोडत नाही.

shilpa shinde gets rape and murder threats for supporting navjot singh sidhu on pulwama attack issue | नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण करणा-या शिल्पा शिंदेला रेपची धमकी!

नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण करणा-या शिल्पा शिंदेला रेपची धमकी!

googlenewsNext
ठळक मुद्देआता शिल्पा काय बोलली तर तिने नवज्योत सिंग सिद्धू व पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी गैर ठरवली.

शिल्पा शिंदेकडे सध्या कुठलेही काम नाही. पण आपल्या उलटसुलट वक्तव्यांमुळे चर्चेत राहण्याचे काम मात्र ती चोख बजावतेय.  चर्चेत येण्याची एकही संधी शिल्पा सोडत नाही. ताजे प्रकरणही असेच. शिल्पाने संधी साधली आणि वादात सापडली. होय, शिल्पा शिंदेने नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण केली. यानंतर काय होणार, लोक अक्षरश: तिच्यावर तुटून पडले. सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रोल झाली. इतकेच नाही तर काहींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. एका युजरने तर सगळी हद्द पार करत,  शिल्पाला रेपची धमकी दिली. अर्थात जीवे मारण्याची व रेपची धमकी देणाºयांना शिल्पानेही सडेतोड उत्तर देत, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.


आता शिल्पा काय बोलली तर तिने नवज्योत सिंग सिद्धू व पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी गैर ठरवली. ‘माझ्या मते, कुणालाही बॅन करणे योग्य नाही. प्रत्येकाला पैसा कमवण्याचा अधिकार आहे. पाकिस्तानी कलाकारांवरची बंदीही मला चुकीची वाटते. हे कलाकार स्वत:तील प्रतिभेच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेत. कधीकाळी माझ्यावरही बंदी लादली गेली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत किती चुकीचे होतेय, ते मी समजू शकते,’ असे शिल्पाने म्हटले. 


पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संताप व्यक्त होत असताना शिल्पाने हे मत मांडून अनेकांची नाराजी ओढवून घेतली. याआधी नवज्योत सिंग सिद्धूने लोकांची नाराजी ओढवून घेतली होती. काही लोकांच्या कृत्यासाठी संपूर्ण देशाला जबाबदार ठरवता येणार नाही.  पुलवामा हल्ला भ्याड आहे, त्याची मी निंदा करतो. पण यासाठी जे जबाबदार आहेत, त्यांनाच शिक्षा मिळायला हवी,असे नवज्योत म्हणाला होता. पाकिस्तानची पाठराखण करणाºया त्याच्या या वक्तव्यावरून रान पेटले होते.

Web Title: shilpa shinde gets rape and murder threats for supporting navjot singh sidhu on pulwama attack issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.