अन् शिल्पा शेट्टीला अचानक रडू कोसळलं, ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या सेटवर ढसाढसा रडली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 11:32 AM2021-08-20T11:32:54+5:302021-08-20T11:33:21+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अद्यापही तुरूंगात आहे. पण शिल्पा पुन्हा एकदा ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मध्ये परतली आहे. पुन्हा तिने या शोचे शूटींग सुरु केले आहे. 

shilpa shetty kundra breaks down on the sets of super dancer chapter 4 on getting grand welcome | अन् शिल्पा शेट्टीला अचानक रडू कोसळलं, ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या सेटवर ढसाढसा रडली अभिनेत्री

अन् शिल्पा शेट्टीला अचानक रडू कोसळलं, ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या सेटवर ढसाढसा रडली अभिनेत्री

googlenewsNext
ठळक मुद्देशिल्पा शेट्टी 2016 पासून ‘सुपर डान्सर’ या शोची परीक्षक आहे. त्यामुळे या शोचे निर्माते शिल्पाची प्रतीक्षा करत होते.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) अद्यापही तुरूंगात आहे. पोर्नोग्राफच्या आरोपाखाली गेल्या 19 जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर शिल्पाला सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केले गेले. पतीच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसली नाही. अगदी ‘हंगामा 2’ या तिच्या सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटला जाणे तिने टाळले. इतकेच नाही तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ (Super Dancer 4) या शोमध्येही गेले काही आठवडे ती गायब दिसली. पण आता शिल्पा पुन्हा एकदा या शोमध्ये परतली आहे. पुन्हा तिने या शोचे शूटींग सुरु केले आहे. 

सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या सेटवर व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडत असतानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शिल्पा फोटोग्राफर्सला हात दाखवून अभिवादन करताना दिसतेय. अर्थात तिच्या चेह-यावर एक वेगळाच खिन्नपणा आहे. उदास चेह-याने शिल्पाने  ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या सेटवर एन्ट्री घेतली. पण या सेटवर तिचे जोरदार स्वागत झाले. हे स्वागत पाहून शिल्पा भावुक झाली. तिचे अश्रू अनावर झाले.

बॉलिवूड लाईफने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शूटींगसाठी शिल्पा सेटवर येताच अनुराग बासू व गीता कपूरने तिचे स्वागत केले. सर्व स्पर्धकांनीही तिला मिठ्या मारून आनंद साजरा केला. शिल्पाला हे अपेक्षित नसावे. हे स्वागत पाहून शिल्पा ढसाढसा रडायला लागली. संपूर्ण टीमने यानंतर तिला शांत केले.
शिल्पा शेट्टी 2016 पासून ‘सुपर डान्सर’ या शोची परीक्षक आहे. त्यामुळे या शोचे निर्माते शिल्पाची प्रतीक्षा करत होते.
शिल्पाची धाकटी बहीण शमिता शेट्टी सुद्धा ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये आहे. कुटुंबावर संकट कोसळलेलं असतानाही तिनेही कमिटमेंट पूर्ण करत बिग बॉसच्या घरात जाण्याचा निर्णय घेतला.

Web Title: shilpa shetty kundra breaks down on the sets of super dancer chapter 4 on getting grand welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.