शीना बजाजला साकारायचीय रेखा यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 15:14 IST2018-06-15T09:44:51+5:302018-06-15T15:14:51+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'मरीयम खान रिपोर्टींग लाईव्ह' या मध्ये टीव्ही अभिनेत्री मेहेर खान, शीना बजाजची भूमिका साकारत असून, ...

Sheena Bajaj's role of Sakarayachi Rekha | शीना बजाजला साकारायचीय रेखा यांची भूमिका

शीना बजाजला साकारायचीय रेखा यांची भूमिका

ट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'मरीयम खान रिपोर्टींग लाईव्ह' या मध्ये टीव्ही अभिनेत्री मेहेर खान, शीना बजाजची भूमिका साकारत असून, ती आपल्या करियर बद्दल बोलताना म्हणाली कि, जर भविष्यात तिची बॉलिवूडच्या भूमिकांसाठी निवड झाली तर, तिला बॉलीवूड अभिनेत्री रेखाजीची बायोपीक भूमिका करायला नक्की आवडेल.शिनाने भट्ट कॅम्पच्या अनेक चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले असून, ती म्हणाली की, ती रेखाच्या चाहत्यांपैकी एक असून, रेखाबरोबर किंवा पुढील आयुष्यात रेखाजीच्या भूमिकेतील अभिनय साकारण्याची इच्छा आहे.शीना म्हणाली, रेखा हि एक सुंदर अभिनेत्री असून अजूनही ती खूप सुंदर आणि आकर्षक वाटते.मी नेहमीच टीव्हीवर तिचे चित्रपट पाहत असते आणि आजही मला तिचे सिलसिला, खूबसुरत आणि उमरावजान हे चित्रपट खूप आवडतात. मला कधीतरी एकेदिवशी तिची भूमिका करायला आवडेल आणि त्या भूमिकेला मी योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करेल.

'मरियम खान रिपोर्टिंग लाइव' मालिकाचे कथा भोपाळच्या पार्श्वभूमीवर असणार आहे.या मालिकेपूर्वीही देशना 'इस प्यार को क्या नाम दूं' आणि 'बाल कृष्ण'मालिकेत झळकली होती. सध्या अनेक मालिकेत बच्चेकंपनीचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकवेळा बच्चेकंपनीला आपण लहान भूमिका करताना पाहिले आहे.मात्र आता तसे नसून बच्चेकंपनी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह'ही मालिका रसिकांचे मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल असा निर्मात्यांना विश्वास आहे. 

Web Title: Sheena Bajaj's role of Sakarayachi Rekha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.