"ती मायेने कुशीत घेते...", अर्चना पाटकर यांच्या कठीण काळात अश्विनी महांगडे खंबीरपणे पाठीशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:03 IST2025-12-31T12:02:16+5:302025-12-31T12:03:17+5:30

Ashwini Mahangade And Archana Patkar : संकटाच्या काळात अश्विनी महांगडेने सांगितली अर्चना पाटकरांची 'माणुसकी'

"She embraces me with love...", Ashwini Mahangade firmly supports Archana Patkar during her difficult time | "ती मायेने कुशीत घेते...", अर्चना पाटकर यांच्या कठीण काळात अश्विनी महांगडे खंबीरपणे पाठीशी

"ती मायेने कुशीत घेते...", अर्चना पाटकर यांच्या कठीण काळात अश्विनी महांगडे खंबीरपणे पाठीशी

अभिनेत्री हेमलता बाणे पाटकर हिला २९ डिसेंबर, २०२५ रोजी दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली. तिच्यासोबत अमरीना मॅथ्यू फर्नांडिस हिलाही अटक करण्यात आली आहे. गोरेगावमधल्या एका बांधकाम व्यावसायिकाकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप दोघींवर करण्यात आला आहे. हेमलताच्या अटकेनंतर 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्री ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. कारण हेमलता त्यांची सून आहे. त्यानंतर अर्चना यांनी पोस्ट शेअर करत हेमलता आणि त्यांचा मुलगा चार वर्षांपूर्वी विभक्त झाले आहेत. त्यांचा आता तिच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणानंतर आई कुठे काय करते मालिकेतील अर्चना यांची सहकलाकार अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने त्यांना पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केली.

अश्विनी महांगडे हिने अर्चना पाटकर यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, ''ती उत्तम कलाकार आहे, तिच्यातली माणुसकी आपल्याला खूप शिकवून जाते, ती सहकलाकार म्हणून अप्रतिम आहे कारण ती सांभाळून घेते, ती नकळत आपल्यावर चांगले संस्कार करते, ती प्रेम देते, ती मायेने कुशीत घेते, ती आपण खचलो तर आपल्याला हात देते, ती सतत आपल्याला उंच भरारी घे असंच सांगत राहते, ती मैत्रीची सगळी कर्तव्य पार पाडते.. ती माझी #अर्चूडी, #आज्जूडी….अर्चना पाटेकर माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे.'' 


काय आहे अर्चना पाटकर यांची पोस्ट?
अर्चना पाटकर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ''मायबाप प्रेक्षकांना तसेच मीडियाला नमस्कार, मी गेली ४० वर्षे या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटींच्या खंडणीबद्दल चर्चा होतेय आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत. मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा ४ वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झालाय. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका. धन्यवाद- अर्चना पाटकर''.

Web Title : मुश्किल समय में अश्विनी महांगडे ने अर्चना पाटकर का समर्थन किया।

Web Summary : बहू की गिरफ्तारी के बाद, अर्चना पाटकर ने अलगाव स्पष्ट किया। सह-कलाकार अश्विनी महांगडे ने एक सहायक संदेश साझा किया, इस कठिन समय के दौरान पाटकर की दयालुता और मार्गदर्शन की सराहना की।

Web Title : Ashwini Mahangade supports Archana Patkar during a difficult time.

Web Summary : Following her daughter-in-law's arrest, Archana Patkar clarified their separation. Co-star Ashwini Mahangade shared a supportive message, praising Patkar's kindness and mentorship during this trying period.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.