'लव-लग्न-लोचा'मधील शाल्मलीला करायची वेबसिरीज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 12:00 IST2017-05-25T06:30:08+5:302017-05-25T12:00:08+5:30
'लव लग्न लोचा' या मालिकेत आपलं हास्य आणि अभिनयामुळे अभिनेत्री सिद्धी कारखानीस रसिकांची लाडकी बनली आहे. आपल्या अभिनयाने तिने ...

'लव-लग्न-लोचा'मधील शाल्मलीला करायची वेबसिरीज !
' ;लव लग्न लोचा' या मालिकेत आपलं हास्य आणि अभिनयामुळे अभिनेत्री सिद्धी कारखानीस रसिकांची लाडकी बनली आहे. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. या मालिकेनं सिद्धी घराघरात पोहचली आहे. मालिकेनं तिला नवी ओळख, प्रसिद्धी दिली आहे. असं असलं तरी तिला छोट्या पडद्यावर मालिका साकारण्यात फारसा रस नाही. त्यामुळेच या मालिकेनंतर सिद्धीला एखादी वेबसिरीज करायची आहे. मनोरंजनाची माध्यमं कालानुरुप बदलत चालली आहेत.आजच्या तरुणाईला टीव्हीपेक्षा सोशल मीडिया किंवा डिजिटल माध्यम जास्त भावतंय. हीच बाब सिद्धीलाही चांगलीच पटली आहे.तिच्या मते आगामी युग हे डिजीटल युग असेल आणि त्यामुळेच डिजिटल माध्यमातील वेबसिरीज हा तरुणाईमध्ये हिट होणार प्रकार भविष्यात आणखी वाढेल असं सिद्धीला वाटतंय. तसंच येत्या दहा वर्षात टीव्हीचं अस्तित्व कितपत राहिल अशी शंकाही तिला वाटते. त्यामुळे येत्या काळात मालिका करण्यापेक्षा वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी सिद्धी उत्सुक आहे. त्या दृष्टीने तिचे प्रयत्नही सुरु झाले आहेत. कॉलेजमध्ये असताना एकांकिकांमध्ये तिनं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. दस्तुरखुद्द या एकांकिकेतून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. घरच्यांचा विरोध डावलून तिनं अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या क्षेत्रात तिनं मिळवलेलं यश पाहून तिचे कुटुंबीयसुद्धा खुश आहेत. कॉलेजनंतर अस्मिता मालिकेत तिनं छोटीशी भूमिका साकारत छोट्या पडद्यावर एंट्री मारली. त्यानंतर माझा होशील का, देवयानी आणि आता लव लग्न लोचा अशा मालिकांमध्ये तिच्या अभिनयाची जादू रसिकांना पाहायला मिळत आहे.