शशांक व्यासला रूप-मर्द का नया स्वरूप या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी झाली दुखापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 16:25 IST2018-10-02T16:21:19+5:302018-10-02T16:25:29+5:30

रूप-मर्द का नया स्वरूप या मालिकेतील त्याच्या भूमिकेसाठी तो सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. या मालिकेसाठी जीममध्ये अनेक तास घाम गाळून त्याने खूप चांगली शरीरयष्टी देखील बनवली आहे.

Shashank vyas got injured on the set of Roop - Mard Ka Naya Swaroop | शशांक व्यासला रूप-मर्द का नया स्वरूप या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी झाली दुखापत

शशांक व्यासला रूप-मर्द का नया स्वरूप या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी झाली दुखापत

कलर्सच्या रूप- मर्द का नया स्वरूप या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आडवत आहेत. या मालिकेत काहीच महिन्यांपूर्वी शशांक व्यासची एंट्री झाली आहे. 

शशांक व्यासने बालिकावधू या मालिकेत काम केले होते. बालिकावधू या मालिकेद्वारेच त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या पहिल्याच मालिकेत त्याने साकारलेल्या जग्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेनंतर त्याने जाना ना दिल से दूर या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्याच्या रावीश या भूमिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सध्या तो रूप-मर्द का नया स्वरूप या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत दोनल बिष्ट सोबत त्याची जोडी जमली असून या मालिकेतील तो एका परफेक्ट लव्हरच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले आहेत. त्याचा या मालिकेतील लूक देखील प्रेक्षकांना आवडत आहे.

रूप-मर्द का नया स्वरूप या मालिकेतील त्याच्या भूमिकेसाठी तो सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. या मालिकेसाठी जीममध्ये अनेक तास घाम गाळून त्याने खूप चांगली शरीरयष्टी देखील बनवली आहे. या मालिकेचे चित्रीकरण करताना त्याला नुकताच अपघात झाला असून त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. पण तरीही तो या मालिकेचे चित्रीकरण करत आहे. 

शशांकची या मालिकेच नुकतीच एंट्री झाली आहे. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी 12 वर्षांचा लीप घेतला. या लीपनंतर प्रेक्षकांना शशांक पाहायला मिळाला. या मालिकेत प्रवेश करण्याआधी शशांक व्यासने दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले होते की, ''मी नेहमीच परिणामकारक आणि अनोख्या भुमिकेच्या शोधात असतो. या मालिकेची अनोखी आणि कठोर अशी संकल्पना असल्याने ही मालिका स्वीकारली. लिंगभेदाविषयी नेहमीच बोलले जाते आणि त्यात बदल झालाच पाहिजे. कलर्सने आणि रश्मी शर्मा टेलिफिल्म्सने मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.''

Web Title: Shashank vyas got injured on the set of Roop - Mard Ka Naya Swaroop