शशांक केतकरला लहानपणापासून आवडतो हा पदार्थ, पोस्ट शेअर करत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 06:44 PM2024-03-28T18:44:45+5:302024-03-28T18:46:45+5:30

Shashank Ketkar : सध्या शशांक केतकर 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

Shashank Ketkar has been fond of this food since childhood, he disclosed while sharing the post | शशांक केतकरला लहानपणापासून आवडतो हा पदार्थ, पोस्ट शेअर करत केला खुलासा

शशांक केतकरला लहानपणापासून आवडतो हा पदार्थ, पोस्ट शेअर करत केला खुलासा

अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा (Muramba) मालिकेत काम करतो आहे. या मालिकेत त्याने साकारलेल्या अक्षयची भूमिका चाहत्यांना खूप भावते आहे. शशांक सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतो. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याच्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितले आहे.

शशांक केतकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, काल खूप महिन्यांनी पुण्याला घरी गेलो होतो. अगदी लहानपणापासून आवडीचा पदार्थ म्हणजे, सालपापडी. आई कडे किंवा आजी कडे कधी डिमांड केली की त्या नेहमी म्हणायच्या, उन्हाळ्यात करेन. काल तो योग आला!

तो पुढे म्हणाला की, मी, प्रियांका आणि ऋग्वेद येतोय म्हटल्यावर आईने ३ दिवस आधी तांदूळ भिजवले आणि आमच्यासाठी सालपापड्या केल्या.  शिल्पा केतकर, शिरीष केतकर, दिक्षा केतकर, नचिकेत गुत्तीकर, प्रियंका केतकर, ऋग्वेद आणि मी …सगळ्यांनी मिळून अक्षरशः एका बैठकीत सगळं पीठ संपवल!  तुम्हाला आवडते का सालपापडी ? तुम्ही काय म्हणता?? सालपापडी की फेण्या ? की आणखी काही?

वर्कफ्रंट..

शशांक केतकरने मालिकेव्यतिरिक्त चित्रपट आणि नाटकातही काम केले आहे. नुकताच तो इमरान हाश्मीच्या शो टाइम या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकला. . याआधी तो 'स्कॅम २००३' या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. सध्या शशांक 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
 

Web Title: Shashank Ketkar has been fond of this food since childhood, he disclosed while sharing the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.