शशांक पुन्हा पडला प्रेमात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 17:18 IST2016-10-28T13:22:12+5:302016-10-28T17:18:41+5:30

सिनेमा असो किंवा मालिकांमध्ये प्रेमाचे अंकुर फुलणारी कथा दिसली नाही तरच नवल. सुरूवातीला मालिकेतले कलाकारांमध्ये भांडणं होतात, मग मैत्री ...

Shashank fell in love! | शशांक पुन्हा पडला प्रेमात !

शशांक पुन्हा पडला प्रेमात !

नेमा असो किंवा मालिकांमध्ये प्रेमाचे अंकुर फुलणारी कथा दिसली नाही तरच नवल. सुरूवातीला मालिकेतले कलाकारांमध्ये भांडणं होतात, मग मैत्री होते त्यानंतर हळुहळु प्रेम बहरू लागतात असे सर्वसाधारण लव्हट्रक मालिकेत पाहिले आहेत. असाच काहीसा लव्हट्रॅक 'इथेच टाका तंबू' या मालिकेतही पाहायला मिळतोय. यापूर्वी 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेत शशांक केतकर साकारत असलेल्या श्री आणि जान्हवी यांच्या रोमँटीक अंदाजला रसिकांनी भरघोस पसंती दिली होती. पुन्हा एकदा सा-यांचा लाडका श्री आता कपिल साठेच्या रूपात ऑनस्क्रिन प्रेमात पडला आहे. मात्र यावेळी तो 'इथेच टाका तंबू' मालिकेत मधुरा देशपांडे हिच्या प्रेमात पडला आहे. शशांकचे रोमँटीक अंदाज पाहण्यासाठी रसिकही आतुर झाले होते. त्यामुळे रोमँटीक अंदाजला शशांक म्हणजेच कपिलच्या भूमिकेला रसिकांची चांगली पसंती मिळते. मालिकेत दाखवल्याप्रमाणे शशांक आणि मधुरा हे चांगले मित्र झाले आहेत.आता तर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्यामुळे त्यांचा रोमँटीक अंदाज रसिकांनाही आवडतोय. शशांक या मालिकेसाठी फ्रेश चेहरा नसला तरी सा-यांचा लाडका आहे. त्याच्याबरोबर मधुरा देशपांडे ही फ्रेश चेहरा असल्यामुळे या दोघांचा लव्हट्रॅक मालिकेसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे दिग्दर्शक हेमंत देवधरने सांगितले.


 

Web Title: Shashank fell in love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.