रायझिंग स्टारच्या दुस-या पर्वालाही शंकर महादेवन करणार जज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 12:45 IST2017-12-21T07:15:45+5:302017-12-21T12:45:45+5:30
नाविन्यपूर्ण आणि कल्पक विषय देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या कलर्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केंद्रभागी ठेवून भारताचा पहिला लाइव्ह रिअॅलिटी शो पुन्हा घेऊन ...

रायझिंग स्टारच्या दुस-या पर्वालाही शंकर महादेवन करणार जज!
न विन्यपूर्ण आणि कल्पक विषय देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या कलर्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केंद्रभागी ठेवून भारताचा पहिला लाइव्ह रिअॅलिटी शो पुन्हा घेऊन येत आहे.या शोच्या दुस-या आवृत्ती मध्ये जगभरातील हजारो महत्वाकांक्षी हुशार गायक त्यांचा संगीतमय पराक्रम सर्वात मोठ्या मंचावर दाखविण्यासाठी एक संधी मिळावी म्हणून सज्ज झाले आहेत.राष्ट्रीय पारितोषिक विजेते संगीतकार-गायक शंकर महादेवन कलर्सच्या 'रायझिंग स्टार' या शोच्या दुस-या आवृत्तीसाठी टेलिव्हिजन स्क्रीनवर परत येणार आहेत. शंकर महादेवन यांच्या सोबत असणार आहेत अभिनेते-गायक दिलजित दोसान्झ आणि भावगीतगायक मोनाली ठाकूर.शोवर पुनरागमन करत असल्या विषयी बोलताना] शंकर महादेवन म्हणाले पहिल्या यशस्वी सीझन नंतर हा शो भारताच्या पुढच्या रायझिंग स्टारच्या शोधात दुस-या सीझनसह परत येत आहे. या वर्षी मला आशा आहे की मला भारताच्या कानाकोप-यातून जास्तीत जास्त गुणवान मुले प्रकाशझोतात आलेली पहायला मिळतील.आता ही स्पर्धा जास्तच कठीण आणि जास्त स्पर्धात्मक होत चालली आहे.ऑप्टिमिस्टिक्स एंटरटेनमेंट द्वारा निर्मित रायझिंग स्टार हा शो यावर्षी जास्त मोठा आणि चांगला असणार आहे तसेच त्यात जगाच्या प्रत्येक कोप-यातून निवडलेल्या महत्वाकांक्षी हुशार गायकांचा मेळा असणार आहे.
रायझिंग स्टारच्या पहिल्या पर्वातही शंकर महादेवन यांनी परीक्षकाची भूमिका बजावली होती.लाईव्ह वोटींग करत ऑडीयन्सना जर एखाद्याचा परफॉर्मन्स आवडला तो स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पात्र ठरायचा.अशा प्रकारे हा पहिला शो आहे ज्यात जज चॉईसनुसार नाही तर रसिकांच्या चॉईसनुसार स्पर्धक निवडले जातात.शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर यांनी हा शो जज केला होता.विशेष म्हणजे रायझिंग स्टार हा शो नीतीनसाठी खूप लकी ठरला.त्याच्या या खास परफॉर्मन्समुळे शंकर महादेवन खूपच प्रभावित झाले. त्यांनी चक्क नीतीनलाच आपल्या म्युझिक अकॅडमीमध्ये गाण्याचे मोफत प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले.शंकर महादेवन यांच्या म्युझिक अकॅडमीमध्ये 67 अधिक देशांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत शिकवले जाते.त्यामुळे त्यांनी नीतीननेही त्यांची अकॅडमीत सहभागी होण्याची इच्छा शंकर महादेवनने या कार्यक्रमात व्यक्त केली.कधीही स्वप्नातही विचार केला नसेल असे खास गिफ्ट त्यादिवशी नीतीनला मिळाल्याने तो खूप भावूकही झाला होता.