शनाया अमेरिकेला नाही तर नव्या वाहिनीवरुन रसिकांच्या भेटीला?, फॅन्समध्ये कुजबूज आणि चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 09:07 AM2018-09-01T09:07:59+5:302018-09-01T09:14:24+5:30

यशस्वी राधिका, अहंकारी गुरु आणि साऱ्यांची लाडकी शनाया यांच्या अवतीभवती फिरणारं कथानक यामुळे मालिका रंजक झाली आहे. अशातच मालिकेतील रसिकांची लाडकी असलेली शनाया फेम अभिनेत्री रसिका सुनील ही मालिकेतून अचानक एक्झिट घेत आहे.

Shanaya Not Going To U.S,Will Feature In New Serial Of New Channel, Buzz In Fans | शनाया अमेरिकेला नाही तर नव्या वाहिनीवरुन रसिकांच्या भेटीला?, फॅन्समध्ये कुजबूज आणि चर्चा

शनाया अमेरिकेला नाही तर नव्या वाहिनीवरुन रसिकांच्या भेटीला?, फॅन्समध्ये कुजबूज आणि चर्चा

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या निर्णयाक वळणावर आहे. मालिकेच्या कथानकातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिका रसिकांना भावतेय. गेल्या काही आठवड्यात तर या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलंय. यशस्वी राधिका, अहंकारी गुरु आणि साऱ्यांची लाडकी शनाया यांच्या अवतीभवती फिरणारं कथानक यामुळे मालिका रंजक झाली आहे. अशातच मालिकेतील रसिकांची लाडकी असलेली शनाया फेम अभिनेत्री रसिका सुनील ही मालिकेतून अचानक एक्झिट घेत आहे. येत्या रविवारपासून या मालिकेतील शनाया बदलणार असून रसिका सुनीलची जागा 'जय मल्हार' मालिकेतील बानू फेम इशा केसकर घेणार आहे. मात्र रसिकांची लाडकी शनाया म्हणजेच रसिकाची अशाप्रकारे एक्झिट रसिकांना रुचलेली नाही. तिने मालिका का सोडली याच्या आता चर्चा सुरु झाल्या आहेत. रसिका अभिनयाच्या शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र यावर रसिकांना विश्वास नाही. एवढ्या चांगल्या अभिनेत्रीला अभिनयाच्या शिक्षणाची गरज काय असा सवाल रसिक विचारतायत. त्यामुळे रसिका अमेरिकेला नाही तर एका वाहिनीवरील नव्या मालिकेत झळकणार असल्याच्याही चर्चा ऐकायला मिळत आहेत. ही मालिका कोणती, वाहिनी कोणती याबाबत मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. एकूणच काय तर रसिकाच्या भविष्यातील योजनांबाबत सध्या सस्पेन्स आहे. मात्र रसिक त्यांच्या लाडक्या शनायाला कायम मिस करतील. तसंच तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी फॅन्ससह आमच्याही शुभेच्छा रसिकासोबत कायम असतील. 

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनाया आणि ईशा यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहेच. आपला दोस्ताना कायम ठेवत पुन्हा एकदा बदमाशिया करण्यासाठी या दोघी सज्ज झाल्या आहेत. फक्त आता त्यांचा हा दोस्ताना येऊ घातलेल्या 'यू अँड मी' या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी आहे.'जरा सा कट्टा टाकू आता... जरासी बाते तेढीमेढी..., थोडासा किस्सा करू आता...  थोडीशी यादे तेरी मेरी..., करू आम्ही मनमानिया... ऐसी है अपनी यारीया...'  असे म्हणत रसिका सुनील आणि आदिती द्रविड, आपला दोस्ताना या अल्बमच्या माध्यमातून दाखवणार आहेत. या दोघींचा 'यू अँड मी' हा नवाकोरा अल्बम लवकरच प्रेक्षक भेटीस येत असून व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे.'यू अँड मी' या गाण्याची खासियत म्हणजे स्वत: आदिती द्रविड हिने हे गाणे लिहिले असून आदिती आणि रसिकानेच हे गाणे गायले आहे. या अल्बमच्या निमित्ताने रसिकाच्या गायकीची नवी ओळख प्रेक्षकांना होणार आहे. साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. फुलवा खामकर हिने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. लोणावळा येथे चित्रित झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत. 

Web Title: Shanaya Not Going To U.S,Will Feature In New Serial Of New Channel, Buzz In Fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.