चाहूल २ मालिकेत सर्जा ओळखू शकणार का खऱ्या शांभवीला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 15:11 IST2017-09-11T09:37:16+5:302017-09-11T15:11:35+5:30
चाहुल या मालिकेच्या यशानंतर चाहुल २ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेची कथा आता एका रंजक ...

चाहूल २ मालिकेत सर्जा ओळखू शकणार का खऱ्या शांभवीला?
च हुल या मालिकेच्या यशानंतर चाहुल २ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेची कथा आता एका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. निर्मला सर्जाला आपल्या आयुष्यात आणण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाली असून खरी शांभवी कुठे आहे, कशी आहे हे कोणालाच कळलेले नाही. निर्मलाने शांभवीला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये तिला यश आले नाही. शांभवीच्या रूपात तिने सर्जाच्या आयुष्यात बायको म्हणून स्थान मिळवले आहे. पण आता निर्मलाच्या समोर खरी शांभवी उभी राहाणार आहे. खऱ्या शांभवीला पाहून निर्मलाच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. शांभवीला पाहिल्यानंतर आता ती सर्जाला आपल्यापासून दूर करणार याची निर्मलाला खात्री पटली आहे. खरी शांभवी आता राणी नावाने वाड्यामध्ये आली आहे. राणी सर्जाला वेळोवेळी तीच खरी शांभवी आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. सर्जा राणीवर विश्वास ठेवेल? खरी शांभवी सर्जासमोर निर्मलाचे सत्य कसे आणेल? सर्जाला ती निर्मलापासून कशी वाचवेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.
मामाने सांगितल्याप्रमाणे शांभवीने स्मृती गेल्याचे सगळ्यांना खोटे सांगितले आहे. सर्जा शांभवीला ओळखू शकला नाही कारण तिचा आता चेहरा बदलला आहे. पण निर्मलाने मात्र शांभवीला ओळखले आहे. खऱ्या शांभवीने म्हणजेच राणीने हातामध्ये रुद्राक्ष घातल्यामुळे निर्मला तिला काहीच करू शकत नाहीये. निर्मला म्हणजेच खोट्या शांभवीला सर्जाला मारायचे आहे, कारण असे करूनच तिला सर्जा मिळू शकतो. निर्मलाचे हे सत्य शांभवीला कळले असून ती कशी निर्मलाला थांबवेल हे बघणे रंजक ठरणार आहे.
Also Read : चाहूल फेम शाश्वती पिंपळीकरचा टॅटू तुम्ही पाहिला का?