सलमान खान नाही तर या खानसोबत शोमध्ये कमबॅक करतोय कपिल शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 16:20 IST2018-11-19T16:12:33+5:302018-11-19T16:20:16+5:30
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या फॅन्सना डिसेंबरमध्ये दोन आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. एकतर तो गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार तर दुसरी लवकरच तो कॉमेडी शोमधून पुनरागमन करायला तयार आहे

सलमान खान नाही तर या खानसोबत शोमध्ये कमबॅक करतोय कपिल शर्मा
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या फॅन्सना डिसेंबरमध्ये दोन आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. एकतर तो गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार तर दुसरी लवकरच तो कॉमेडी शोमधून पुनरागमन करायला तयार आहे. आधी अशी चर्चा होती की कपिल शर्माला सलमान खानचे प्रोडक्शन हाऊस प्रोड्यूस करणार आहे. ऐवढेच नाही तर सलमानमुळे शोमध्ये सुनील ग्रोवरसुद्धा कपिलसोबत परतण्यासाठी तयार झाला आहे.
बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार कपिल शर्मासोबत भारती सिंग, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर, कीकू शारदा आणि सुमोना चक्रवतीसुद्धा दिसणार आहे. या शोचा पहिला एपिसोड 23 डिसेंबरला ऑन एअर करण्यात येऊ शकतो. याच्या दुसऱ्यादिवशीच कपिल शर्मा आपल्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन देणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या शोचा फॉर्मेट कपिल शर्माच्या जुन्या कॉमेडी शोसारखाच असणार आहे. या शोच्या पहिलाच एपिसोड धमाकेदार होण्यासाठी शाहरुख खानशी बोलणी सुरु आहे. रिपोर्टनुसार कपिल शर्माच्या पहिल्या एपिसोड शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ म्हणजे संपूर्ण 'झिरो'च्या टीमला आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आहे.