​शाहीर शेख दर महिन्याला इंडोनेशियाला का जातो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 13:02 IST2016-10-28T13:02:23+5:302016-10-28T13:02:23+5:30

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत देवची भूमिका साकारणारा शाहीर शेख आज मुलींच्या दिल की धडकन बनला ...

Shahir Sheikh goes to Indonesia every month? | ​शाहीर शेख दर महिन्याला इंडोनेशियाला का जातो?

​शाहीर शेख दर महिन्याला इंडोनेशियाला का जातो?

छ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत देवची भूमिका साकारणारा शाहीर शेख आज मुलींच्या दिल की धडकन बनला आहे. पुरुषांपेक्षा तो कित्येक पटीने अधिक महिलांमध्ये लोकप्रिय आहे. शाहीर केवळ भारतातच नाही तर इंडोनेशियामध्येही प्रसिद्ध आहे. तो तिथला एक प्रसिद्ध कलाकार आहे. शाहीर इंडोनेशियात प्रसिद्ध कसा हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्याने तिथे अनेक मालिका केल्या असून त्या खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे इंडोनेशियात त्याला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग आहे. 
खरे तर एखाद्या मालिकेत कोणताही कलाकार जेव्हा प्रमुख भूमिका साकारत असतो. त्यावेळी त्याला आपला सगळा वेळ हा त्याच मालिकेला द्यावा लागतो. त्यामुळे त्याला दुसऱ्या कोणत्या मालिकेत काम करता येतच नाही. पण कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेचे चित्रीकरण सांभाळून तो आणखी दोन मालिकेत काम करत आहे आणि या दोन्ही मालिका या इंडोनेशियातील असून या दोन्ही मालिकांचे चित्रीकरणदेखील तिथेच सुरू आहे. या मालिकांच्या चित्रीकरणासाठी शाहीर महिन्यातून काही दिवस तरी इंडोनिशाला जातो. शाहीर सध्या तीन मालिकांमध्ये काम करत असल्याने त्याचे शेड्युल प्रचंड बिझी असते आणि त्यात चित्रीकरणासाठी इंडोनेशियाला येण्या-जाण्यातच त्याचा खूप वेळ जातो. पण तरीही हे सगळे तो खूप एन्जॉय करत असल्याचे तो सांगतो. कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेची संपूर्ण टीम त्याला खूप सांभाळून घेत असल्यानेच त्याला इंडोनेशियातील दोन मालिकांमध्ये काम करता येतेय असेही तो सांगतो. 

Web Title: Shahir Sheikh goes to Indonesia every month?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.