​टेड टॉक्स इंडिया या कार्यक्रमात या व्यक्तीला भेटून शाहरुख खानला झाला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:28 IST2017-12-27T10:58:02+5:302017-12-27T16:28:02+5:30

‘रॉकेट वुमन ऑफ इंडिया’ रितू करिधाल टेड टॉक्स इंडिया नयी सोचच्या ‘टुमॉरोज्‌ वर्ल्ड’ असे शीर्षक असलेल्या चौथ्या भागात प्रेक्षकांना ...

Shah Rukh Khan meets Anand at TED Talks India | ​टेड टॉक्स इंडिया या कार्यक्रमात या व्यक्तीला भेटून शाहरुख खानला झाला आनंद

​टेड टॉक्स इंडिया या कार्यक्रमात या व्यक्तीला भेटून शाहरुख खानला झाला आनंद

ॉकेट वुमन ऑफ इंडिया’ रितू करिधाल टेड टॉक्स इंडिया नयी सोचच्या ‘टुमॉरोज्‌ वर्ल्ड’ असे शीर्षक असलेल्या चौथ्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्या आपले अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहरुख खान करतो. तो या कार्यक्रमात रितू यांना भेटून खूपच खूश झाला होता. आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या रितूसारख्या महिलांचा मला अतिशय अभिमान वाटतो असे शाहरूखने या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितले.
रितू करिधाल या लखनऊ येथे राहाणाऱ्या असून त्या वैज्ञानिक आहेत. त्या सध्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) मध्ये काम करत असून भारताचे मंगळावरील ऑर्बिटल मिशन मंगलयानसाठी त्या डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्टर होत्या. त्यांच्या यशाने प्रभावित झालेल्या शाहरूखनेही स्वदेसच्या चित्रीकरणाच्या वेळेस नासाला दिलेल्या आपल्या भेटीबद्दल सांगितले, “मी स्वदेसच्या चित्रीकरणाच्या वेळेस नासाला भेट दिली होती. तिथे भारतीयांना आणि खासकरून भारतीय महिलांना पाहणे माझ्यासाठी खूपच अभिमानाची बाब होती.” असे किंग खानने सांगितले.
रितू यांना भेटल्यानंतर शाहरूखने त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. टेड टॉक्स या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती नव्या संकल्पना आणि सिद्धांत मांडत आहेत. या कार्यक्रमाने शाहरूख खान, ‘टेड टॉक्स’ आणि ‘स्टार इंडिया’ या तीन महत्त्वाच्या ब्रॅण्डना एकत्र आणले आहे. याविषयी शाहरुख सांगतो, इंटरनेटद्वारे ‘टेड टॉक्स’ची लोकप्रियता वाढण्यापूर्वीपासूनच मी ‘टेड टॉक्स’चा फार मोठा चाहता होतो. या कार्यक्रमाला मी माझ्या जीवनातील माझी सर्वात मोठी कमाई मानतो, या कार्यक्रमाने मला स्वत:ला व्यक्त होण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मी एक कलाकार आहे, जो भावना व्यक्त करू शकतो, गाणं गाऊ शकतो किंवा नाचू शकतो. मी एक मित्र, वडील, पती, उद्योगपती असलो, तरी ‘टेड टॉक्स’ने मला माझ्यातील व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मी जेव्हा या कार्यक्रमात सर्वप्रथम भाषण केले, तेव्हा मी मनातून काहीसा घाबरलो होतो. पण या कार्यक्रमाचे प्रमुख ख्रिस अ‍ॅण्डरसन यांनी मला धीर दिला. 

Also read : करण जोहरला निर्माता बनायचे नव्हते तर या क्षेत्रात करायचे होते करियर



Web Title: Shah Rukh Khan meets Anand at TED Talks India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.