‘कुल्फीकुमार बाजेवाला’मध्ये शफाक नाझची होणार एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:47 IST2018-08-07T12:46:22+5:302018-08-07T12:47:27+5:30

‘स्टार प्लस’ वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या दैनंदिन मालिकेमध्ये नामवंत अभिनेत्री शफाक नाझचा लवकरच प्रवेश होणार आहे.

Shafaq Naaz entry in star plus Kullfi Kumarr Bajewala | ‘कुल्फीकुमार बाजेवाला’मध्ये शफाक नाझची होणार एंट्री

‘कुल्फीकुमार बाजेवाला’मध्ये शफाक नाझची होणार एंट्री

कुल्फी कुमार बाजेवाला ही मालिका स्टार प्लसवर प्रक्षेपित होत असून मोहित मलिक, अंजली मलिक, आकृती शर्मा यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावत आहेत. या मालिकेत आता एका नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार असून त्यामुळे मालिकेला एक चांगलेच वळण मिळणार आहे.

‘स्टार प्लस’ वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या दैनंदिन मालिकेमध्ये नामवंत अभिनेत्री शफाक नाझचा लवकरच प्रवेश होणार आहे. कुल्फीला अपघात झाला असून तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले जाते, हे आपण नुकतेच पाहिले आहे. आता डॉ. नियतीच्या रूपात शफाक नाझचा या मालिकेत प्रवेश होणार आहे. या मालिकेत ती एका आदर्शवादी डॉक्टरची भूमिका साकारणार आहे.

कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेत शफाक नाझ ही एका २३ वर्षीय ज्युनियर डॉक्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ती ज्युनियर असल्याने वरिष्ठांच्या देखरेखीशिवाय शस्त्रक्रिया करण्याची तिला परवानगी नसते, पण कुल्फीचा जीव वाचविण्यासाठी डॉ. नियती आपली करकीर्द पणाला लावणार आहे. 

या मालिकेत शफाकचा प्रवेश अचानक झाला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण तिची मालिकेत एंट्री होणार हा निर्णय केवळ काही दिवसांमध्ये घेण्यात आला आहे. तिने चित्रीकरणाला सुरुवात देखील केली असल्याची चर्चा आहे. आपल्या या भूमिकेबद्दल शफाक प्रचंड उत्सुक आहे. आपल्या भूमिकेविषयी शफाक सांगते, “या मालिकेत मला एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी घेण्यात आलं आहे, ही गोष्ट खरी आहे. यापुढे मालिकेत काय घडणार, याविषयी मी तुम्हाला फार काही सांगू शकणार नाही, पण आता कथा अतिशय उत्कंठावर्धक होणार आहे. मला पूर्वीपासूनच ‘फोर लायन्स फिल्म्स’ या संस्थेबरोबर काम करायचं होतं आणि या भूमिकेमुळे माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. ही माझी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.”

Web Title: Shafaq Naaz entry in star plus Kullfi Kumarr Bajewala