​कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेसाठी आकृती शर्माने एका आठवड्यात पाठ केली आठ गाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 11:20 AM2018-03-09T11:20:01+5:302018-03-09T16:50:01+5:30

‘स्टार प्लस’वर ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत पठाणकोटजवळील मत्सुआ गावातील एका सात ...

For the series Kulfi kumar Bajajwala, the figure has been reduced to eight songs in a week | ​कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेसाठी आकृती शर्माने एका आठवड्यात पाठ केली आठ गाणी

​कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेसाठी आकृती शर्माने एका आठवड्यात पाठ केली आठ गाणी

googlenewsNext
्टार प्लस’वर ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत पठाणकोटजवळील मत्सुआ गावातील एका सात वर्षांच्या मुलीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून अत्यंत सुरेल आणि गोड गळ्याची तिला देणगी लाभलेली आहे. कुल्फी ही आपल्या गोड आवाजाने निराश किंवा दु:खी प्रसंगाचे रूपांतर नेहमीच आनंद आणि सकारात्मक वातावरणात करते असे दाखवण्यात येणार आहे.
कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा अवतारात कुल्फी आपल्या गावातील गल्लीबोळांतून नव्या गोष्टींचा शोध घेत फिरताना आपल्याला दिसणार आहे. 
आपल्या पहिल्याच प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून तर घेतलेल्या कुल्फीकुमार बाजेवाला मालिकेत एका मुलीच्या संगीतमय जीवन प्रवासाची कहाणी सादर करण्यात आली आहे. कुल्फी (आकृती शर्मा) आपल्या मित्रमैत्रिणींना आणि इतर लोकांना नेहमी गाणी गाऊन दाखवते असे मालिकेत दाखवण्यात आले आहे. या मालिकेसाठी आकृती शर्माला एका आठवड्यात आठ गाणी तोंडपाठ करावी लागली होती आणि तिने ती तोंडपाठ केली देखील होती. यामुळे मालिकेची टीम तिच्यावर प्रचंड खूश झाली होती. याविषयी आकृती सांगते, “मालिकेत प्रत्येक भागात मला एक गाणे गायचे असल्याने साहजिकच मला दररोज एक गाणे पाठ करावे लागणार आहे. आम्ही मालिकेच्या चित्रीकरणाला प्रारंभ केल्यानंतर मला पहिल्या आठवड्यासाठी सात आणि शिवाय मालिकेचे शीर्षकगीत अशी आठ गाणी पाठ करावी लागली होती. त्यामुळे माझी आई मला रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सेटवर मी तयार होत असताना गाण्याचे ध्वनिमुद्रण ऐकवत असे. त्यामुळे ही गाणी लक्षात ठेवणे मला सोपे गेले.”
कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत आकृतीसोबतच अंजली आनंद, पल्लवी राव, मेहुल बुच आणि श्रृती शर्मा असे अनेक नामवंत कलाकार प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेसाठी काही गाण्यांची खास निर्मिती देखील करण्यात आली आहेत. तसेच या मालिकेद्वारे इक्बाल खान, अपरा मेहता हे कलाकार देखील छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. 

Also Read : ​‘कुल्फीकुमार बाजावाला’मध्ये या भूमिकेत दिसणार अपरा मेहता

Web Title: For the series Kulfi kumar Bajajwala, the figure has been reduced to eight songs in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.