पाहा कोण आहे एकता कपूरची जुळी बहीण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 11:53 IST2017-11-23T06:23:21+5:302017-11-23T11:53:21+5:30

पाहा कोण आहे एकता कपूरची जुळी बहीण हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. एकता कपूर ही अभिनता जितेंद्र ...

See who is Ekta Kapoor's twin sister? | पाहा कोण आहे एकता कपूरची जुळी बहीण?

पाहा कोण आहे एकता कपूरची जुळी बहीण?

हा कोण आहे एकता कपूरची जुळी बहीण हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. एकता कपूर ही अभिनता जितेंद्र यांची कन्या आहे. जितेंद्र यांना तुषार आणि एकता अशी दोनच मुले असताना ही तिसरी मुलगी कुठून आली हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. पण एकताला नुकत्याच झालेल्या इंडियन टेलिव्हिजन अॅकेडमी पुरस्कार सोहळ्यात तिचा जुळी बहीण भेटली. ही जुळी बहीण म्हणजे दुसरी कोणीही नसून अभिनेता अली असगर आहे.
इंडियन टेलिव्हिजन अॅकेडमी अॅवॉर्डस नुकतेच पार पडले. या अॅवॉर्डसच्या रात्री टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील दिग्गज एका मंचावर एकत्र आलेले पाहायला मिळाले. छोट्या पडद्यावरील बेस्ट टॅलेंटचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मनिष पॉल आणि अली असगर यांनी या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. या दोघांनी उपस्थित असलेल्या सगळ्यांना खळखळून हसवले. 
अली असगर हा नक्कल करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या कार्यक्रमात त्याने अनेक प्रसिद्ध व्यक्तिरेखांच्या नकला खूपच चांगल्या प्रकारे केल्या. या पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर भारतीय टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरचा अवतार धारण करून अली आला होता. त्याने तिची फक्त नक्कलच केली आहे असे नाही, तर टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये तिचा वाटा किती आहे हे देखील त्याने सगळ्यांना सांगितले. अलीचा हा परफॉर्मन्स एकताला देखील प्रचंड आवडल्यामुळे तिने देखील अली सोबत खूप मजेदार गप्पा मारल्या. याविषयी अली सांगतो, “एकताने मला माझ्यातील एक अभिनेता शोधण्यासाठी मदत केली आणि मी यासाठी तिचा अतिशय आभारी आहे. हा कार्यक्रम म्हणजे तिला धन्यवाद देण्याचा एक मार्ग आहे आणि मला आशा आहे की मला हा कार्यक्रम करताना जेवढा आनंद मिळाला तितकाच आनंद प्रेक्षकांना तो पाहाताना होईल.”
इंडियन टेलिव्हिजन अॅवॉर्डस हा खूप प्रसिद्ध आणि सन्मानित पुरस्कार सोहळा मानला जातो. भारतातील संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्याचा हा छोटासा प्रयत्न असतो. 

Web Title: See who is Ekta Kapoor's twin sister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.