पाहा शमा सिकंदरचे हॉट पिक्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 13:01 IST2017-01-09T12:04:11+5:302017-01-09T13:01:40+5:30

शमा सिकंदरने ये मेरी लाइफ है, बालवीर यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. नुकतीच शमा सेक्सोहॉलिक या शॉर्टफिल्ममध्ये झळकली होती. ...

See Shama Sikandar's Hot Picture | पाहा शमा सिकंदरचे हॉट पिक्चर

पाहा शमा सिकंदरचे हॉट पिक्चर

ा सिकंदरने ये मेरी लाइफ है, बालवीर यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. नुकतीच शमा सेक्सोहॉलिक या शॉर्टफिल्ममध्ये झळकली होती. सध्या शमा चित्रीकरणातून वेळ काढून साऊथ आफ्रिकेतील केप टाऊन येथे फिरायला गेली आहे. तिथले तिने तिचे हॉट पिक्चर इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत. 
शमा सिकंदर काही दिवसांपूर्वी चांगलीच चर्चेत आली होती. मानसिक आजारामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता असे नुकत्याच एका मुलाखतीत तिने म्हटले होते. तिने मुलाखतीत सांगितले होते की, "काही वर्षांपूर्वी मला लोकांशी बोलायला अजिबातच आवडायचे नाही. मी कोणाला भेटायलादेखील तयार नसायची. हे सगळे का घडत होते हे मला माझे कळत नव्हते. मी सगळ्या फ्रेंड्सनादेखील भेटणे सोडून दिले होते. माझ्या मनात माझ्याविषयीच तिरस्कार निर्माण झाला होता असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. माझ्या करियरमध्ये आणि प्रेमप्रकरणातही अनेक चढउतार आले होते. या सगळ्यामुळे खूपच तणाव वाढला होता. मला जेवणाचीदेखील इच्छा होत नसे. माझ्यात जगण्याची इच्छाच उरली नव्हती. कोणत्याच गोष्टीमुळे मी आनंदित, उत्साहित होत नव्हती. एका रात्री मी खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण माझ्या घरातल्यांनी मला वेळेत डॉक्टरकडे नेल्याने माझे प्राण वाचले, पण त्यावेळी मला का वाचवण्यात आले, यासाठी मी माझ्या कुटुंबीयांवर खूप चिडले होते. पण नंतर मेडिटेशनच्या मदतीने मी या सगळ्यातून बाहेर पडले. आज मी छोट्याशा गोष्टीतदेखील आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतेय. तसेच स्वतःहून लोकांसोबत मैत्री करते." 
शमा खरेच डिप्रेशनमधून बाहेर पडून आज एक नवीन जीवन जगत आहे हेच आपल्याला या  फोटोतून पाहायला मिळत आहे.


shama sikander hot pictures

shama sikander hot pictures


shama sikander hot pictures

shama sikander hot pictures

shama sikander hot pictures


shama sikander hot pictures

Web Title: See Shama Sikandar's Hot Picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.